मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Rate in 2024 : नवीन वर्षात सोन्याचा भाव वाढणार की घसरणार? वाचा

Gold Rate in 2024 : नवीन वर्षात सोन्याचा भाव वाढणार की घसरणार? वाचा

Dec 28, 2023, 04:02 PM IST

  • Gold Rates likely to rise in 2024: नव्या वर्षात सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

Gold

Gold Rates likely to rise in 2024: नव्या वर्षात सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

  • Gold Rates likely to rise in 2024: नव्या वर्षात सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

Gold Rates News: लवकरच २०२४ च्या नवीन वर्षाला सुरुवात होईल. नव्या वर्षात सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या अहवालानुसार, राजकीय तणाव, केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी आणि मंदीची भीती यांसारख्या कारणांमुळे २०२४ मध्ये सोन्याच्या किंमती आणखी वाढतील. जगभरात मंदी येण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

icici vs axis bank : आयसीआसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला आणि का?

Income tax filing : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा, अन्यथा होईल मनस्ताप

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या मते, अर्थव्यवस्थेचा वेग वाढल्यास सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकते. दरम्यान, अर्थव्यवस्थेचा वेग वाढेल, अशी फक्त ५ ते १० टक्के शक्यता आहे. अनेक अर्थतज्ञांना अमेरिकेत 'सॉफ्ट लँडिंग'ची अपेक्षा आहे, जेथे फेडरल रिझर्व्ह मंदी न आणता चलनवाढ नियंत्रित करते. अर्थव्यवस्था किंचित मंदावण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्याच्या भावात वाढ होईल किंवा असेच राहतील. परंतु, सोन्याच्या किंमतीत घट होईल, अशी काहीच अपेक्षा नाही. सध्या मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक केली जात आहे.

दरम्यान, जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत मध्यवर्ती बँकांनी ८०० मेट्रिक टन सोने खरेदी केले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्के जास्त आहे. वर्षभरात यूएस, भारत आणि तैवानमध्ये मोठ्या निवडणुका झाल्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीसाठी अधिक सुरक्षितता हवी आहे. मध्यवर्ती बँकांनी २०२४ मध्ये सोन्याची खरेदी सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे. जरी त्यांनी पूर्वीपेक्षा कमी सोन्याची खरेदी केली. तरीही सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या भावात बुधवारी पुन्हा किंचित वाढ झाली आहे. तर, चांदीच्या भावात २०० रुपयांनी घसरण पाहायला मिळाली. मुंबईत बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम म्हणजेच तोळ्यामागे ६३,८२० रुपये आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर या सर्व शहरांतील सोन्याचा भाव एकसमान होता. तर, चांदीचा भाव मंगळवारच्या तुलनेत किलोमागे ३०० रुपयांनी घसरून ७९,२०० रुपयांवर आला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर या शहरांतही किलोमागे चांदीचा भाव ७९,२०० रुपये इतकाच आहे.

पुढील बातम्या