मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Rate Today : सोने आणि चांदी महागली! मुंबईत आजचा भाव किती?

Gold Silver Rate Today : सोने आणि चांदी महागली! मुंबईत आजचा भाव किती?

Dec 26, 2023, 03:16 PM IST

  • Gold Silver Rate Today : लगीनसराईमुळं सोने व चांदीच्या भावानं चढाई सुरूच ठेवली आहे. आज सोनं व चांदी दोन्ही महागले आहेत. 

Gold Silver Rate Today

Gold Silver Rate Today : लगीनसराईमुळं सोने व चांदीच्या भावानं चढाई सुरूच ठेवली आहे. आज सोनं व चांदी दोन्ही महागले आहेत.

  • Gold Silver Rate Today : लगीनसराईमुळं सोने व चांदीच्या भावानं चढाई सुरूच ठेवली आहे. आज सोनं व चांदी दोन्ही महागले आहेत. 

Gold Silver Rate Today in Mumbai : लगीनसराई असल्यानं सोने व चांदीच्या भावाकडं सर्वसामान्यांचं लक्ष आहे. सोनं खरेदी करण्याचा विचार असलेल्या सर्वसामान्यांची निराशा करणारी बातमी आहे. सोन्याचे भाव आज वाढले आहेत. चांदीच्या भावातही वाढ झाली आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

icici vs axis bank : आयसीआसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला आणि का?

Income tax filing : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा, अन्यथा होईल मनस्ताप

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम म्हणजेच तोळ्यामागे ६३,७१० रुपये आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत हा भाव २२० रुपयांनी अधिक आहे. यात जीएसटी व अन्य खर्चाचा समावेश नाही. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर या सर्व शहरांतील सोन्याचा भाव आज एकसमान आहे.

IPO Listing : मुथुटच्या शेअरनं पहिल्याच दिवशी दिला झटका; गुंतवणूकदारांची पळापळ

तर, एक किलो चांदीचा भाव कालच्या तुलनेत ३०० रुपयांनी वाढून ७९,५०० रुपयांवर पोहोचला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर या शहरांतही किलोमागे चांदीचा भाव ७९,५०० रुपये इतकाच आहे. यात जीएसटी व अन्य खर्चाचा समावेश करण्यात आलेला नाही. मागच्या दहा दिवसांत चांदीच्या भावात १८०० रुपयांची वाढ झाली आहे. 

महाराष्ट्रात सोन्याचा आजचा दर

२४ कॅरेट - ६३,७१० रुपये (१० ग्रॅम किंवा एक तोळा)

२२ कॅरेट - ५८,४०० रुपये (१० ग्रॅम किंवा एक तोळा)

१८ कॅरेट - ४७,७८० रुपये (१० ग्रॅम किंवा एक तोळा)

सोने-चांदीच्या दरात चढउतार का होतात?

भारतात सर्वसाधारणपणे इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन सोने व चांदीचे भाव निश्चित करते. त्यासाठी काही घटकांचा आधार घेतला जातो. सोन्या-चांदीच्या किमतीतील चढ-उतारांना अनेक घटक कारणीभूत असतात. त्यात आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील घटकही कारणीभूत असतात. मोठ्या शहरांमध्ये त्या-त्या शहरांतील मोठे व्यापारी भाव निश्चित करतात.

जगभरात असलेली सोन्याची मागणी, देशा-देशांच्या चलनमूल्यातील फरक, सध्याचे व्याजदर आणि सोन्याच्या व्यापारासंदर्भातील सरकारी नियम या सर्व बाबी भावांमधील चढउतारास कारणीभूत ठरतात. शिवाय, जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची ताकद याचाही सोने व चांदीच्या किंमतीवर परिणाम होत असतो.

विभाग

पुढील बातम्या