मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Go First Airline : गो फर्स्टचं होणार टेक आॅफ, डीजीसीएने दिला हिरवा कंदील, अटींची पूर्तता करणं बंधनकारक

Go First Airline : गो फर्स्टचं होणार टेक आॅफ, डीजीसीएने दिला हिरवा कंदील, अटींची पूर्तता करणं बंधनकारक

Jul 26, 2023, 10:33 AM IST

    • Go First Airline : संकटग्रस्त गो फर्स्टच्या फ्लाइट सेवा मे २०२३ पासून बंद आहेत, परंतु आता ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी सशर्त अटींसह हिरवा सिग्नल मिळाला
Go first Airline HT (File)

Go First Airline : संकटग्रस्त गो फर्स्टच्या फ्लाइट सेवा मे २०२३ पासून बंद आहेत, परंतु आता ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी सशर्त अटींसह हिरवा सिग्नल मिळाला

    • Go First Airline : संकटग्रस्त गो फर्स्टच्या फ्लाइट सेवा मे २०२३ पासून बंद आहेत, परंतु आता ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी सशर्त अटींसह हिरवा सिग्नल मिळाला

Go First Airline : भारतीय हवाई वाहतूक नियामक डीजीसीएने संकटात अडकलेल्या गो फर्स्ट एअरलाईन्सला आॅपरेशन सुरू करण्याची सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे मे महिन्यापासून बंद असलेल्या गो फर्स्ट विमानांचा टेक आॅफचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र हे पहिले टेक आॅफ नेमक्या कोणत्या तारखेला होईल याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

डीजीसीएने यासंदर्भात जारी केलेल्या नोटीफिकेशनमध्ये म्हटले आहे की, २८ जूनच्या दिल्ली उच्च न्यायालय आणि एनसीएलटीसमोर प्रलंबित याचिकेतील निकालानुसार प्रस्तावित पूर्नस्थापना योजना स्विकारली आहे. डीजीसीए गो फर्स्ट फ्लाईट आॅपरेशन सुरु करू शकते. पण त्यासाठी काही नियमक अटीची पूर्तता करावी लागेल.

त्यानुसार एअरलाईन्सला विमानांच्या टेक आॅफसाठी योग्यता जारी ठेवावी लागेल. त्यात कोणताही बदल झाल्यास कंपनीने डीजीसीएला सुचित करावे. यासंदर्भात कंपनीने ट्विट केले आहे. आॅपरेशनल कारणांमुळे सर्व उड्डाणे २३ जुलै २०२३ पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. मुंबई, दिल्लीतील गो फर्स्ट सुविधांचे विशेष आँडिट करणार असल्याची माहिती नियामकाने या महिन्याच्या सुरूवातीला दिली होती. एअरलाइन ऑपरेटरने मे महिन्याच्या सुरुवातीला एनसीएलटीकडे ऐच्छिक दिवाळखोरीच्या ठरावासाठी अर्ज केला होता. तेव्हापासून विमानसेवा बंद आहे.

विभाग

पुढील बातम्या