मराठी बातम्या  /  बिझनेस  /  GO first Airline : गो फर्स्ट एअरलाईन्सचे तिकीट बुकिंग तात्काळ बंद करा, डीजीसीएचे आदेश

GO first Airline : गो फर्स्ट एअरलाईन्सचे तिकीट बुकिंग तात्काळ बंद करा, डीजीसीएचे आदेश

May 08, 2023, 05:27 PM IST

    • GO first Airline : दिवाळखोरी प्रक्रियेत असलेल्या गो फर्स्ट एअरलाईन्सची तिकीट बुकिंग तात्काळ बंद करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने यासंदर्भात कंपनीला नोटीस बजावली आहे.
Go first Airlines HT

GO first Airline : दिवाळखोरी प्रक्रियेत असलेल्या गो फर्स्ट एअरलाईन्सची तिकीट बुकिंग तात्काळ बंद करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने यासंदर्भात कंपनीला नोटीस बजावली आहे.

    • GO first Airline : दिवाळखोरी प्रक्रियेत असलेल्या गो फर्स्ट एअरलाईन्सची तिकीट बुकिंग तात्काळ बंद करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने यासंदर्भात कंपनीला नोटीस बजावली आहे.

GO first Airline : बजेट एअरलाईन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गो फर्स्ट एअरलाईन्ससमोर संकटाची नवी मालिका उभी राहिली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गो फर्स्ट एअरलाईन्सला तात्काळ तिकिट बुकिंग रोखण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीने पुढील आदेश येईपर्यंत प्रवाश्यांना कोणत्याही प्रकारची तिकिट विक्री करु नये असे त्यात स्पष्ट म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया सुरू करण्याच्या उद्देशाने, डीजीसीएने विमान नियम १९३७ अंतर्गत गो फर्स्टला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. एक विश्वसनीय सेवा प्रदाता म्हणून एअरलाइन्स आपली भूमिका पार पाडण्यात अपयशी ठरल्याचे डीजीसीएचे मत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तिकीट विक्रीवर रोख

गो फर्स्टने १५ मे पर्यंत तिकिटांची विक्री थांबवली आहे. यासोबतच विमान कंपनीने १२ मे पर्यंत आपली उड्डाणे रद्द केली आहेत. गेल्या आठवड्यात एअरलाइनने वेळेवर इंजिन वितरणामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा हवाला देत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) समोर स्वैच्छिक दिवाळखोरी ठराव अर्ज दाखल केला.

important notice of Go first airlines HT

या याचिकेवर सुनावणी झाली असून निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी एअरलाईन्सने एनसीएलटीकडे त्वरित सुनावणी करण्याची विनंती केली आहे. एअरलाइनने एनसीएलटीकडे अंतरिम स्थगिती मागितली आहे. अंतरिम स्थगिती अर्थात कर्जाशी संबंधित प्रकरणामध्ये प्रलंबित असलेली कोणतीही कायदेशीर कार्यवाही रखडलेली मानली जाईल.

प्रवाश्यांचे पैसे परत करणार

डीजीसीएच्या आदेशावर १५ दिवसाच्या आत उत्तर देणे गो फर्स्ट एअरलाईन्सला बंधनकारक करण्यात आले आहे. तर आता या कारवाईनंतर एअरलाईन्स कंपनी प्रवाश्यांना तिकीटासाठी घेतलेले पैसे परत देणार आहे.

विभाग

पुढील बातम्या