मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Group : अदानी समूहाला जून तिमाहीत ४२ टक्के नफा, हिडनबर्गचा झटका ओसरला का ?

Adani Group : अदानी समूहाला जून तिमाहीत ४२ टक्के नफा, हिडनबर्गचा झटका ओसरला का ?

Aug 23, 2023, 06:36 PM IST

    • Adani Group : अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून २०२३ या पहिल्या तिमाहीत परिचालन नफा (EBITDA) ४२ टक्के नोंदवला आहे.
gautam adani HT

Adani Group : अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून २०२३ या पहिल्या तिमाहीत परिचालन नफा (EBITDA) ४२ टक्के नोंदवला आहे.

    • Adani Group : अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून २०२३ या पहिल्या तिमाहीत परिचालन नफा (EBITDA) ४२ टक्के नोंदवला आहे.

Adani Group : अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून २०२३ या पहिल्या तिमाहीत परिचालन नफा (EBITDA) ४२ टक्के नोंदवला आहे. एअरपोर्टसपासून ते पावर,पोर्टपर्यंत अदानी समूहाने जून तिमाहीच चांगला नफा कमावला आहे. अदानी समूहाने बुधवारी २३ आॅगस्टला जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. अदानी समूहाने सांगितले की, जून तिमाहीत कंपनीने २३,५३२ कोटी रुपयांचा परिचालन नफा नोंदवला आहे. ही आकडेवारी २०१९ मध्ये नोंदवण्यात आलेल्या २४,७८० कोटींच्या परिचालन नफ्याच्या समान पातळीवर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अदानी समूहाच्या बाजारात १० कंपन्या सूचीबद्ध आहेत. त्यात अदानी एंटरप्राईजेस, अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पावर लिमिटेड, अदानी एनर्जी सोल्यूशन, अदानी टोटल गॅस सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. अंदाजे ४२,११५ कोटी रुपये कॅश बॅलन्सनंतर अदानी समूहाच्या या कंपन्यांवर अंदाजे १८,६८९.७ कोटी रुपयांचे कर्ज आहे.

यावर्षाच्या सुरूवातीला हिडेनबर्गने अनेक प्रकारचे आरोप कंपनीवर लावले होते. अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले. या अहवालानंतर अदानी समूहाच्या बाजारभांडवलात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे आता अदानी समूहाने आपली रणनिती बदलून कामगिरी सुधारण्यावर भर दिला आहे.

जूनच्या तिमाहीत अदानी इन्फ्रा आणि यूटीलीटी बिझनेसचा परिचालन नफा २०,२३३ कोटी रुपये नोंदवण्यात आला आहे. कर पूर्व लाभाच्या तुलनेत तो ८६ टक्के आहे. याचप्रमाणे अदानी एअरपोर्ट, ग्रीन हायड्रोजनसहित इतर व्यवयासाचा नफा वार्षिक आधारावर दुप्पट होऊन तो अंदाजे १७१८ कोटी रुपये नोंदवण्यात आला आहे.

विभाग

पुढील बातम्या