मराठी बातम्या  /  बिझनेस  /  future retail shares : दोन दिवस अप्पर सर्किट, आता ट्रेडिंग बंद, फ्यूचर रिटेलचे फ्यूचर अंधारात ?

future retail shares : दोन दिवस अप्पर सर्किट, आता ट्रेडिंग बंद, फ्यूचर रिटेलचे फ्यूचर अंधारात ?

Nov 15, 2022, 03:11 PM IST

    • future retail shares : फ्यूचर समुहाच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस अप्पर सर्किट लागले होते पण आता पुन्हा या शेअर्सचे ट्रेडिंग बंद करण्यात आले आहे. काय आहेत कारणं जाणून घ्या -
future retail HT

future retail shares : फ्यूचर समुहाच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस अप्पर सर्किट लागले होते पण आता पुन्हा या शेअर्सचे ट्रेडिंग बंद करण्यात आले आहे. काय आहेत कारणं जाणून घ्या -

    • future retail shares : फ्यूचर समुहाच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस अप्पर सर्किट लागले होते पण आता पुन्हा या शेअर्सचे ट्रेडिंग बंद करण्यात आले आहे. काय आहेत कारणं जाणून घ्या -

future retail shares : कर्जबाजारी झालेल्या किशोर बियाणी यांच्या कंपनीच्या खरेदीत अंबानी - अदानी समुहाने रस दाखवल्यानंतर फ्युचर ग्रुपच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात कमालीची वाढ झाली होती.

ट्रेंडिंग न्यूज

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

मात्र, आज पुन्हा एकदा कंपनीच्या शेअर्सचे व्यवहार ठप्प झाले आहेत. याआधी गेल्या महिन्याच्या सुरुवातीला फ्यूचर रिटेल शेअर्सचे ट्रेडिंग बंद करण्यात आले होते.

वास्तविक, कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. त्यामुळे कंपनीचे डिलिस्टिंग कऱण्यात आले. जेंव्हा एखादी कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असते किंवा ती ट्रेड करण्यास सक्षम नसते तेंव्हा तिचे डिलिस्टिंग केले जाते.

शुक्रवारच्या सत्रात ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर्समध्ये तब्बल ५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समुह आणि फ्लेमिंगो समुह, रिलायन्स रिटेल वेंचर्स आणि मून रिटेल प्रायव्हेट समुहासह १३ कंपन्यांनी दिवाळखोरीत गेलेल्या फ्यूचर रिटेल्सचा व्यवसाय खरेदीची इच्छा व्यक्त केली आहे. याद्वारे खरेदीदारांना फ्यूचर रिटेल्सच्या असेस्टमध्ये आपले स्वारस्य व्यक्त केले आहे. तर बोलीदारांचा फोकस हा नागपूरमधील पुरवठा साखळीतील गोदामांवर आहे.

फ्यूचर सप्लाय चेन सोल्युशन्सला आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ७०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कंपनी एकूण ८.०२ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळ असलेले ६५ वितरक सेटर चालवते. कंपनीचे देशभरात १३ हब आणि १२३ शाखा आहेत. कंपनी फ्रँचायझीही देते.

 

विभाग

पुढील बातम्या