मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Market 2024 : पैसे जपून ठेवा! स्विगीपासून ओला, ओयोपर्यंत अनेक नामांकित कंपन्यांचे आयपीओ येतायत

IPO Market 2024 : पैसे जपून ठेवा! स्विगीपासून ओला, ओयोपर्यंत अनेक नामांकित कंपन्यांचे आयपीओ येतायत

Dec 23, 2023, 07:14 PM IST

  • Upcoming ipo in 2024 : सरत्या वर्षात शेअर बाजारात अनेक नव्या कंपन्या सूचीबद्ध झाल्या. नवं वर्ष देखील यास अपवाद नसेल. आगामी वर्षातही अनेक नामांकित कंपन्या आयपीओ आणणार आहेत.

IPO Market 2024

Upcoming ipo in 2024 : सरत्या वर्षात शेअर बाजारात अनेक नव्या कंपन्या सूचीबद्ध झाल्या. नवं वर्ष देखील यास अपवाद नसेल. आगामी वर्षातही अनेक नामांकित कंपन्या आयपीओ आणणार आहेत.

  • Upcoming ipo in 2024 : सरत्या वर्षात शेअर बाजारात अनेक नव्या कंपन्या सूचीबद्ध झाल्या. नवं वर्ष देखील यास अपवाद नसेल. आगामी वर्षातही अनेक नामांकित कंपन्या आयपीओ आणणार आहेत.

Upcoming IPO News : सरत्या वर्षात शेअर बाजारानं केवळ किरकोळ गुंतवणूकदारांनाच आकर्षित केलं असं नाही तर अनेक कंपन्याही शेअर बाजाराकडं वळल्या. बीएसई व एनएसईवर मोठ्या संख्येनं कंपन्या सूचीबद्ध झाल्या. मागच्या दहा वर्षातील हा दुसरा मोठा आकडा आहे. लिस्टिंगचा हा ट्रेंड नव्या वर्षातही सुरूच राहणार आहे. आगामी २०२४ या वर्षात सुमारे ६०,००० कोटींचे आयपीओ येणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

प्राइम डेटाबेसच्या आकडेवारीनुसार, यंदा ५७ कंपन्यांनी आयपीओद्वारे बाजारातून सुमारे ४९ हजार कोटी रुपये उभे केले. याशिवाय २७ कंपन्यांना सेबीकडून २९ हजार कोटी रुपये उभारण्याची परवानगी मिळाली आहे. तर २९ कंपन्या ३४ हजार कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

Stocks To Watch in 2024 : पुढच्या वर्षात हे १० शेअर देऊ शकतात दणदणीत नफा, एक्सपर्ट्सचीही पसंती

२०२४ मध्ये या कंपन्यांचा आयपीओ अपेक्षित

यंदा अनेक मोठ्या कंपन्यांचे आयपीओ आले. टाटा समूहानं जवळपास १९ वर्षांनी आपल्या कंपनीचा आयपीओ आणला. पुढील वर्षी ओला इलेक्ट्रिक, स्विगी आणि फर्स्टक्राय सारख्या मोठ्या कंपन्यांच्या आयपीओच्या रांगेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या तीन कंपन्या प्रत्येकी ४००० कोटी रुपयांचा आयपीओ आणू शकतात. याशिवाय टाटा प्ले, एबिक्सकॅश, इंडिजिन, ओरावल स्टेज, गो डिजिट जनरल इन्शुरन्स, पोर्टिया मेडिकल आणि टीबीओ टेकचे आयपीओ येऊ घातले आहेत.

स्विगी

सॉफ्टबँकची गुंतवणूक असलेली स्विगी २०२४ च्या सुरुवातीच्या महिन्यांत आयपीओ आणण्याची दाट शक्यता आहे. आयपीओच्या माध्यमातून सुमारे ५०० दशलक्ष डॉलर उभारण्याचा कंपनीचा उद्देश आहे. षा आहे. या आयपीओच्या माध्यमातून सॉफ्टबँक स्विगीमधील आपला शेअर कमी करणार आहे.

फर्स्ट क्राय

पुणे स्थित स्टार्टअप आणि चाइल्डकेअर ऑनलाइन प्लॅटफॉर्म फर्स्टक्राय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयपीओ लाँच करेल अशी अपेक्षा आहे. फर्स्टक्राय याद्वारे ५००-६०० दशलक्ष डॉलर उभारण्याच्या विचारात आहे.

IPO News : ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय हा आयपीओ, तुम्ही तयार आहात का?

ओला इलेक्ट्रिक

ओला इलेक्ट्रिक २०२४ च्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आपला आणेल असं बोललं जातंय. ओला इलेक्ट्रिक या माध्यमातून ४०० दशलक्ष डॉलर उभारणार असून त्यातून तामिळनाडूमध्ये आपला पहिला कारखाना सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.

ओयो

ओयोनं देखील आयपीओसाठी अर्ज दाखल केला आहे. पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत हा आयपीओ येईल. याद्वारे सुमारे ४०० दशलक्ष डॉलर उभे करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.

पोर्टिया मेडिकल

हेल्थकेअर स्टार्टअप पोर्टिया मेडिकलला २०२३ च्या सुरुवातीलाच सेबीकडून आयपीओची मंजुरी मिळाली होती. कंपनीनं १००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत हा आयपीओ येईल, अशी अपेक्षा आहे.

पुढील बातम्या