मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Diwali sale : सॅमसंगचे दोन ५जी फोन अर्ध्या किंमतीत, खरेदीची आज शेवटची संधी

Diwali sale : सॅमसंगचे दोन ५जी फोन अर्ध्या किंमतीत, खरेदीची आज शेवटची संधी

Nov 11, 2023, 10:20 AM IST

  • flipkart big diwali sale last day news : फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये सॅमसंगचे ५जी फोन अर्ध्या किंमतीत मिळत आहे. खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे. 

Flipkart diwali sale on Samsung smartphone

flipkart big diwali sale last day news : फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये सॅमसंगचे ५जी फोन अर्ध्या किंमतीत मिळत आहे. खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे.

  • flipkart big diwali sale last day news : फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये सॅमसंगचे ५जी फोन अर्ध्या किंमतीत मिळत आहे. खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे. 

flipkart big diwali sale news in marathi :  दिवाळीच्या निमित्तानं ग्राहकांवर ऑफर्स आणि सवलतींचा वर्षाव सुरू आहे. ई कॉमर्स कंपन्या यात आघाडीवर आहेत. फ्लिपकार्टचा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला बिग दिवाळी सेल आज संपणार आहे. बंपर डिस्काउंटमध्ये स्मार्टफोन हे या सेलचं वैशिष्ट्य असून जवळपास अर्ध्या किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असल्यास फ्लिपकार्टचा दिवाळी सेल तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या दिवाळी सेलमध्ये सॅमसंगचे ८ जीबी रॅमचे दोन वेगवेगळे ५ जी स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत मिळत आहेत. Samsung Galaxy S21 FE 5G आणि Galaxy S22 5G फोनवर तब्बल ५३ टक्के सूट आहे.

PPF सह विविध अल्प बचत योजनांचे नियम झाले शिथील; तुम्हाला कसा होणार फायदा?

या स्मार्टफोन्स ३५ हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देण्यात येत आहे. बँकेकडून मिळणारी सवलत लक्षात घेतली तर हे दोन्ही फोन तुम्हाला आणखी दीड हजार रुपयांनी स्वस्त पडतील. Flipkart Axis Bank आणि Samsung Axis Bank च्या कार्ड धारकांना या फोनवर १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल.

Galaxy S22 5G

८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ८५,९९९ रुपये आहे. फ्लिपकार्टच्या सेलमधील ५३ टक्के सवलतीमुळं तो ३९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत ३५ हजार रुपयांनी कमी होऊ शकते. एक्सचेंज बोनस जुन्या फोनची स्थिती, ब्रँड, एरिया पिनकोड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. या फोनवर १० टक्के कॅशबॅकचीही संधी आहे.

६.१ इंच फुल एचडी+ डिस्प्लेसह प्रोसेसरच्या रूपात Snapdragon 8 Gen 1 चिपसेट आहे. फोनची बॅटरी ३७००mAh क्षमतेची आहे. यात एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यात १२ व ५० मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह १० मेगापिक्सेल कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Muhurat Trading : मुहूर्ताचं ट्रेडिंग म्हणजे काय? हा मुहूर्त का महत्त्वाचा? यंदाची वेळ काय? जाणून घेऊया सर्व काही

Galaxy S21 FE 5G

८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी ६९,९९९ रुपये आहे. ५२ टक्के डिस्काउंटनंतर हा फोन तुम्हाला ३२,९९९ रुपयांना पडेल. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन ३० हजार रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. SBI कार्डनं पेमेंट केल्यास दीड हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. तुमच्याकडं Flipkart Axis Bank कार्ड असल्यास ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल.

फोनमध्ये ६.४ इंची फुल एचडी+ डिस्प्ले आहे. फोटोसाठी १२ मेगापिक्सेलच्या दोन कॅमेर्‍यांसह ८ मेगापिक्सेलचा एक OIS कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट मिळेल.

 

(डिस्क्लेमर : हा लेख ई-कॉमर्स वेबसाइट्सवर दिलेल्या एक्सचेंज ऑफर आणि सवलतींच्या माहितीवर आधारित आहे. एक्सचेंज ऑफर गॅझेटच्या स्थितीवर अवलंबून असते. त्यामुळं खरेदी करण्यापूर्वी किंमत तपासा. अधिक माहितीसाठी संबंधित कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या.)

पुढील बातम्या