मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bank FD Rates : ७५० दिवसांच्या एफडीवर ९.२१ टक्के व्याज, 'या' बँकेची तगडी ऑफर

Bank FD Rates : ७५० दिवसांच्या एफडीवर ९.२१ टक्के व्याज, 'या' बँकेची तगडी ऑफर

Nov 06, 2023, 12:47 PM IST

  • Fincare small finance Bank FD Interest rate news : एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

Fincare small finance bank FD rates (MINT_PRINT)

Fincare small finance Bank FD Interest rate news : एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

  • Fincare small finance Bank FD Interest rate news : एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

Fincare small finance FD interest : बँकेतील मुदत ठेवींवर विश्वास ठेवून त्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. मागील काही दिवसांपासून सर्वच बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. मात्र, काही बँकांनी ग्राहकांना सर्वाधिक व्याज देऊ केलं आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेनंही एफडीवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदत ठेवींवर ३ ते ८.६१ टक्के व्याज देत आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना ३.६० टक्क्यांपासून ते ९.२१ टक्के व्याज देत आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या मुदत ठेवींवरील नवीन व्याजदर २८ ऑक्टोबर २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत.

Indian Angels : प्रेक्षकांना स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीची संधी देणारा आगळावेगळा इन्व्हेस्टमेंट शो ओटीटीवर

७५० दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेनं ७५० दिवसांच्या मुदत ठेवींवर भरघोस व्याजाची ऑफर दिली आहे. या कालावधीच्या मुदत ठेवीवर सर्वसाधारण ग्राहकांना ८.६१ टक्के व्याज दिलं जात आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीच्या एफडीवर ९.२१ टक्के व्याज देण्यात येत आहे.

वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडीचे व्याज दर

७ ते १४ दिवसांची मुदत ठेव - ३ टक्के व्याज

१५ ते ३० दिवसांच्या कालावधीच्या मुदत ठेव - ४.५० टक्के व्याज

३१ ते ४५ दिवसांची मुदत ठेव - ५.२५ टक्के व्याज

४६ ते ९० दिवसांची मुदत ठेव - ५.७६ टक्के व्याज

९१ ते १८० दिवसांची एफडी - ६.२५ टक्के व्याज

१८१ दिवसांपासून ते ३६५ दिवसांपर्यंतची एफडी - ६.५० टक्के व्याज

वर्षाहून अधिक कालावधीच्या एफडीसाठी…

> १२ ते १५ महिन्यांच्या एफडीवर फिनकेअर बँकेनं ७.५० टक्के व्याज देऊ केलं आहे.

> १५ महिने १ दिवस ते ४९९ दिवसांच्या एफडीवर ७.८५ टक्के व्याज दिलं जात आहे.

> फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ५०० दिवसांच्या एफडीवर ८.२१ टक्के व्याज देत आहे.

> १८ ते २४ महिन्यांच्या एफडीवर ही बँक ८.११ टक्के तर २४ महिने ते ७४९ दिवसांच्या एफडीवर ८.१५ टक्के व्याज दिलं जात आहे.

> १००० दिवसात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ८.४१ टक्के व्याज दिलं जात आहे.

> १००१ दिवसांपासून ते ३६ महिन्यांपर्यंतच्या एफडीवर ८.११ टक्के व्याज आहे.

> ३६ महिन्यांपासून ४२ महिन्यांपर्यंतच्या एफडीवर ८.२५ टक्के व्याज दिलं जात आहे.

 

विभाग

पुढील बातम्या