मराठी बातम्या  /  बिझनेस  /  fd interest rates : १ हजार दिवसांच्या एफडीवर तब्बल ९ टक्के व्याज, या बँकेनं आणली खास योजना

fd interest rates : १ हजार दिवसांच्या एफडीवर तब्बल ९ टक्के व्याज, या बँकेनं आणली खास योजना

Oct 10, 2023, 11:34 AM IST

  • fincare small finance bank FD Rates : एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी कमाईची मोठी संधी चालून आली आहे.

Bank FD Rates

fincare small finance bank FD Rates : एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी कमाईची मोठी संधी चालून आली आहे.

  • fincare small finance bank FD Rates : एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी कमाईची मोठी संधी चालून आली आहे.

fincare small finance bank FD Rates : शेअर मार्केटसह वेगवेगळ्या गुंतवणुकीवर चांगला नफा मिळत असला तरी त्यात जोखीम मोठी असते. त्यामुळं सर्वसामान्य गुंतवणूकदार आजही मुदत ठेवींचा (Fixed Deposit) पर्याय स्वीकारताना दिसतात. सध्या मुदत ठेवींवर व्याजही चांगलं मिळत आहे. अगदी ७ टक्क्यांपर्यंत व्याज काही बँका देत आहेत. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेनं या सर्वांना मागे टाकत तब्बल ९ टक्के व्याज देणारी आकर्षक योजना आणली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

फिनकेअर बँकेनं २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल केले आहेत. त्यानुसार, या बँकेनं १००० दिवसांच्या मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना ९.११ टक्क्यांपर्यंत व्याज देऊ केलं आहे. तर, याच कालावधीसाठी बँक सर्वसाधारण खातेदारांना ८.५१ टक्के व्याज देत आहे.

७ दिवस ते १० वर्षे कालावधीची एफडी

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदत ठेवींवर सर्वसामान्य ग्राहकांना ३ टक्के ते ८.५१ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधईपासून ३.६० टक्के ते ९.११ टक्के व्याज दिलं जात आहे.

असे आहेत वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडी दर

१५ ते ३० दिवसांची मुदत ठेव - ४.५० टक्के

३१ ते ४५ दिवसांची मुदत ठेव - ४.७५ टक्के

४६ ते ९० दिवसांची मुदत ठेव - ५.२५ टक्के

९१ ते १८० दिवसांची मुदत ठेव - ५.७५ टक्के

१८१ ते ३६५ दिवसांची मुदत ठेव - ६.५० टक्के

५०० दिवसांच्या एफडीवर ८.११ टक्के व्याज

१२ ते १५ महिन्यांच्या मुदत ठेवींवर फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ७.५० टक्के व्याज देते. तर, १५ महिने आणि १ दिवसापासून ते ४९९ दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवींवर ७.७५ टक्के व्याज देते. ५०० दिवसांच्या एफडीवर ८.११ टक्के व्याज देते. तर, ५०१ दिवसांपासून ते १८ महिन्यांपर्यंतच्या एफडीवर ७.७५ टक्के व्याज आहे.

१८ महिने आणि १ दिवसांपासून ते २४ महिन्यांच्या एफडीवर ८.०१ टक्के व्याज देते. तर, २४ महिने आणि १ ते ७४९ दिवसांच्या एफडीवर ८.०५ टक्के व्याज देते. ७५० दिवसांच्या मुदत ठेवीवर ८.५१ टक्के व्याज देते.

बँक ३० महिने आणि १ ते ९९९ दिवसांच्या एफडीवर ८ टक्के व्याज देते. तर १ हजार दिवसांच्या एफडीवर ग्राहकांना ८.५१ टक्के व्याज दिलं जातं. १००१ दिवस ते ३६ महिन्यांच्या मुदत ठेवींवर ८ टक्के व्याज देते.

पुढील बातम्या