मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPFO Deadline : महत्त्वाचा निर्णय! ईपीएफओने उच्च पेन्शनची डेडलाईन ११ जूलैपर्यंत वाढवली

EPFO Deadline : महत्त्वाचा निर्णय! ईपीएफओने उच्च पेन्शनची डेडलाईन ११ जूलैपर्यंत वाढवली

Jun 27, 2023, 09:31 AM IST

  • EPFO Deadline Extended : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत ११ जुलैपर्यंत वाढवली आहे.ई

EPFO HT

EPFO Deadline Extended : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत ११ जुलैपर्यंत वाढवली आहे.ई

  • EPFO Deadline Extended : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत ११ जुलैपर्यंत वाढवली आहे.ई

EPFO Deadline Extended : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ जुलैपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने २६ जून २०२३ पर्यंत उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची शेवटची संधी दिली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

त्यामुळे आता जास्त पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला ११ जुलैपर्यंत अर्ज करावा लागेल. जरी उच्च पेन्शन योजना प्रत्येक सदस्यासाठी नाही. सर्वोच्च न्यायालयाने ४ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार, ईपीएफचे काही सदस्यच उच्च पेन्शनसाठी अर्ज करू शकतात. उच्च पेन्शनसाठी पात्र लोकांनी लवकरात लवकर अर्ज करावा, अन्यथा शेवटची तारीख संपल्यानंतर तुम्हाला जास्त पेन्शन मिळण्यास तुम्ही पात्र राहणार नाही, असे सुतोवाच ईपीएफओने केले आहे. दरम्यान ईपीएफओने यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ दिली आहे.

अनेकदा डेडलाईनमध्ये वाढ

वास्तविक यूजर्स उच्च पेन्शनचा पर्याय निवडीसाठी ईपीएफओकडे अनेकदा डेडलाईन वाढवून मागितली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर सदस्यांना पर्याय निवडीसाठी ४ महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर जास्त पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी सुविधा ३ मे पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा आजपर्यंत म्हणजे २६ जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. त्यात आज ईपीएफओने अधिक सवलत देत जास्त पेन्शनच्या अर्जाची मुदत पुन्हा एकदा ११ जूलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

विभाग

पुढील बातम्या