मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PF News : सहा कोटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ईपीएफओनं बदलला गुंतवणुकीचा नियम

PF News : सहा कोटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ईपीएफओनं बदलला गुंतवणुकीचा नियम

Apr 14, 2023, 12:51 PM IST

  • EPFO Withdrawal Rules : ईपीएफओ धारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवून देण्यासाठी ईपीएफओनं नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

The age-groups of 18-25 years constitutes 55.64% of total of new members under EPFO in December (Mint) (MINT_PRINT)

EPFO Withdrawal Rules : ईपीएफओ धारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवून देण्यासाठी ईपीएफओनं नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • EPFO Withdrawal Rules : ईपीएफओ धारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवून देण्यासाठी ईपीएफओनं नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

EPFO Withdrawal Rules : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (EPFO) सदस्य असलेल्या ६ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओनं शेअरधारकांना अधिक परतावा देण्यासाठी आणि बाजारातील अस्थिरतेपासून त्यांचं रक्षण करण्यासाठी एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मधील गुंतवणूक काढून घेण्याच्या धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुढच्या महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात हे १० शेअर, तुमच्याकडं आहेत का?

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

ईपीएफओच्या सूत्रांनी 'लाइव्ह हिंदुस्तान'ला ही माहिती दिली आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच झाली. त्यात या विषयावर चर्चा झाली आणि नंतर त्याला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, ईपीएफओनं ईटीएफ युनिट्सचा किमान होल्डिंग कालावधी चार वर्षांपेक्षा जास्त करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या ETF चे युनिट्स चार वर्षात रिडीम केले जातात. गुंतवणूक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, EPFO ​​त्याच्या उत्पन्नाच्या ५ ते १५ टक्के रक्कम इक्विटी आणि अन्य योजनांमध्ये गुंतवू शकते.

ऑगस्ट २०१५ मध्ये ईपीएफओनं निफ्टी-५० आणि बीएसई सेन्सेक्सवर आधारित ईटीएफच्या माध्यमातून शेअर बाजारात ५ टक्के गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्विटीमधील प्रत्यक्ष गुंतवणूक १५ टक्क्यांपर्यंत नेण्याचा ईपीएफओचा प्रयत्न आहे.

EPFO नं २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ग्राहकांसाठी ८.१५ टक्के व्याजदर जाहीर केला आहे. मागील आर्थिक वर्षासाठी दिलेल्या ८.१ टक्के व्याजाच्या तुलनेत हा दर किंचित जास्त आहे. व्याज देण्यासाठी ईपीएफओनं २०१८ मधील ETF युनिट्स काढून घेतले होते. त्यातून अंदाजे १०,९६० कोटी रुपये उभारण्यात आले होते.

भांडवली नफा वाढवण्याची कसरत

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या सुधारणांमुळं परताव्याच्या अंतर्गत दरात बदल करण्यास मदत होईल आणि ईटीएफ युनिट्सच्या विक्रीतून येणारा भांडवली नफा वाढेल. ईटीएफ नियमित उत्पन्न देत नाहीत आणि त्याचा परिपक्वता कालावधी निश्चित नसतो. त्यामुळं EPFO ​​वेळोवेळी ईटीएफ युनिट्सची पूर्तता करते. यातून मिळणारा भांडवली नफा नंतर उत्पन्न मानला जातो आणि ईपीएफ सदस्यांना उत्पन्न म्हणून वितरित केला जातो.

शेअर्समधील गुंतवणूक मंदावली!

ETF युनिट्समधून वेळोवेळी पैसे काढल्यामुळे आणि काढलेल्या रकमेपैकी केवळ १५ टक्के पुन्हा गुंतवले गेल्यामुळं EPF कॉर्पसमधील इक्विटी गुंतवणुकीतील वाढ फारच संथ आहे. ३१ जानेवारी २०२३ रोजी इक्विटीमधील गुंतवणूक उत्पन्नाच्या १०.०३ टक्के होती. ही गुंतवणूक एकूण उत्पन्नाच्या १५ टक्क्यांपर्यंत जाण्यासाठी पाच ते सहा वर्षे लागतील, असा अंदाज आहे.

विभाग

पुढील बातम्या