मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPF vs VPF : व्हाॅलेंटरी प्राॅव्हिडंट फंड म्हणजे काय? त्याचे फायदे आणि बचत अशा पद्धतीने करता येईल !

EPF vs VPF : व्हाॅलेंटरी प्राॅव्हिडंट फंड म्हणजे काय? त्याचे फायदे आणि बचत अशा पद्धतीने करता येईल !

Apr 27, 2023, 12:00 PM IST

    • EPF vs VPF : पगारदार लोकांचे पैसे भविष्य निर्वाह निधीत गुंतवले जातात. कमाल १२ टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम व्हाॅलेंटरी प्राॅव्हिडंट फंडात (व्हीपीएफ) गुंतवण्याचा पर्याय खुला आहे. व्हीपीएफमध्ये गुंतवणूक कशा पद्धतीने करता येईल,त्याबद्दल थोडक्यात -
EPFO HT

EPF vs VPF : पगारदार लोकांचे पैसे भविष्य निर्वाह निधीत गुंतवले जातात. कमाल १२ टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम व्हाॅलेंटरी प्राॅव्हिडंट फंडात (व्हीपीएफ) गुंतवण्याचा पर्याय खुला आहे. व्हीपीएफमध्ये गुंतवणूक कशा पद्धतीने करता येईल,त्याबद्दल थोडक्यात -

    • EPF vs VPF : पगारदार लोकांचे पैसे भविष्य निर्वाह निधीत गुंतवले जातात. कमाल १२ टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम व्हाॅलेंटरी प्राॅव्हिडंट फंडात (व्हीपीएफ) गुंतवण्याचा पर्याय खुला आहे. व्हीपीएफमध्ये गुंतवणूक कशा पद्धतीने करता येईल,त्याबद्दल थोडक्यात -

EPF vs VPF : पगारदार कर्मचारी आपल्या ईपीएफ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) मध्ये नियमितपणे योगदान देतात. प्रत्येक महिन्याकाठी तुमच्या वेतनातून ही रक्कम वजा केली जाते. सध्याच्या नियमानुसार तुमच्या पगाराच्या १२ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. तुम्ही काम करत असलेल्या कंपनीने ही रक्कम जुळवली पाहिजे.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

कंपनील कमाल १२ टक्के योगदान द्यावे लागते. पण कर्मचारी म्हणून तुमच्याकडे व्हाॅलेंटरी प्राॅव्हिडंट फंड किमान १२ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक भरण्याचा पर्याय खुला असतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी व्हीपीएस काय आहे आणि त्याचे फायदे नेमके कोणते ते जाणून घेऊया. -

व्हाॅलेंटरी प्राॅव्हिडंट फंड म्हणजे काय

एखाद्या कर्मचाऱ्याने भविष्य निर्वाह निधी खात्यात स्वैच्छिक योगदान दिल्यास ते व्हाॅलेंटरी प्राॅव्हिडंट फंड (व्हीपीएफ) म्हणून ओळखले जाते. हे योगदान कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये १२ टक्क्यांपेक्षा अधिक दिले जात असेल तर ते व्हाॅलेंटरी प्राॅव्हिडंट फंड असते. कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या १०० टक्क्यांपर्यंत एकूण योगदान दिले जाऊ शकते.

ईपीएफ ही व्हीपीएफमधील सातत्या आहे. केवळ ज्या पगारदार लोकांना त्यांची मासिक देयके विशिष्ट पगार खात्याद्वारे मिळतात, त्यांना VPF पर्याय़ खुला असतो.

व्हीपीएफचे फायदे तोटे

- व्हीपीएफमुळे कर बचतीचा पर्याय खुला होतो. कारण व्हीपीएफ ईईई श्रेणींतर्गत येतो. ईईईमध्ये योगदानातून, मुद्दलातून आणि व्याजातून सूट मिळते.

- हे कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात बचतीचा पोर्टफोलिओ तयार करण्यात मदत करते आणि जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पे पार करण्यास मोलाची भूमिका निभावते.

- दीर्घकालीन गुंतवणुकीच्या तुलनेत ही जोखीममुक्त गुंतवणूक मानली जाते.

- व्हीपीएफ कोणत्याही वेळी काढता येतो.

- तुमचे आधार कार्ड तुमच्या व्हीपीएफ खात्याशी जोडलेले आहे. म्हणून, तुमचे खाते एका नियोक्त्याकडून दुसर्‍याकडे हस्तांतरीत करणे अगदी सोपे आहे.

व्हीपीएफमधील योगदान तुम्ही कधी सुरू करु शकतात ?

तुमचे वार्षिक ईपीएफ योगदान २.५ लाखांपेक्षा कमी असल्यास तुमचे एकूण (ईपीएफ+व्हीपीएफ) योगदान रु. २.५ लाखांपर्यंत आणण्यासाठी पुरेशा रकमेसाठी व्हीपीएफचा पर्याय सुरु करता येईल. समजा, तुम्ही ईपीएफमध्ये दरमहा १२५०० रुपये किंवा वार्षिक १.५ लाख रुपये योगदान देत आहात. त्यामुळे तुम्ही मासिक ८३३३ रुपयांचे वार्षिक १ लाख गुंतवू शकतात. या परिस्थितीत तुमचे योगदान कॅपच्या खाली असल्याने तुम्हाला ८.१ टक्के करमुक्त परतावा मिळू शकतो.

विभाग

पुढील बातम्या