मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tesla in India : भारतात २० लाखांत मिळणार टेस्लाची कार; काय आहे एलॉन मस्क यांचा मास्टर प्लान?

Tesla in India : भारतात २० लाखांत मिळणार टेस्लाची कार; काय आहे एलॉन मस्क यांचा मास्टर प्लान?

Jul 14, 2023, 09:03 AM IST

  • Tesla Car in India : टेस्लाने भारतात एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सरकानेही या योजनेसाठी हिरवा कंदील दिल्याचे वृत्त समोर येत आहे. अमेरिकेत मोदींची भेट घेऊन मस्क 'फॅन' झाला होता.

elon musk with Tesla HT

Tesla Car in India : टेस्लाने भारतात एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सरकानेही या योजनेसाठी हिरवा कंदील दिल्याचे वृत्त समोर येत आहे. अमेरिकेत मोदींची भेट घेऊन मस्क 'फॅन' झाला होता.

  • Tesla Car in India : टेस्लाने भारतात एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सरकानेही या योजनेसाठी हिरवा कंदील दिल्याचे वृत्त समोर येत आहे. अमेरिकेत मोदींची भेट घेऊन मस्क 'फॅन' झाला होता.

Tesla Car in India : एलन मस्कची टेस्ला कंपनी भारतात मोठा धमाका करण्यासाठी आता सज्ज आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात मस्कने मोदींची भेट घेतली होती. त्याचीच आता परिणीती दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ला भारतात इलेक्ट्रिक कार लाँन्च करण्याची योजना आता पुढे सरकली आहे. सुरूवातीच्या काळात टेस्ला कंपनी २० लाखांमध्ये गाडी लाँच करण्याची शक्यता आहे. टेस्लाच्या या गाडीमुळे आॅटो सेगमेंटमध्ये इतर कंपन्यांना जबरदस्त स्पर्धा निर्माण होईल.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

जाणून घ्या मस्कचा प्लान

भारतात टेस्ला दाखल करण्याची एलन मस्कच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मुहूर्त मिळत नव्हता. मात्र आता मस्कच्या योजनेला मेक इन इंडियाचं पाठबळ दिलं जाणार आहे. भारताचे वाणिज्य तसेच उद्योग मंत्रालय या चर्चेचे नेतृत्त्व करत आहे. लेव्हल प्लेइंग फिल्ड राखताना सरकारकडून चांगल्या व्यवहाराची अपेक्षा आहे.

मस्कची कंपनी चीननंतर इंडो-पॅसिफिक भागांमध्ये वाहनांच्या निर्यातीसाठी भारताचा बेस म्हणून तयार करण्याच्या विचारात आहे.सरकारला विश्वास आहे की यावेळी गोष्टी पुढे जातील. कारण या योजनेत स्थानिक पातळीवर उत्पादन तसेच निर्यात वृद्धीसाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.हा प्रकल्प पुढील वर्षी भारतात उभा राहण्याची शक्यता आहे.

मस्क मोदी भेट इम्पॅक्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलॉन मस्क यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिकेतील भेटीनंतर काही आठवड्यांनंतरच ही घटना समोर आली आहे. मस्क यांनी स्वत:ला पंतप्रधान मोदींचे फॅन्स म्हटले होते.

टेस्लाची भारत सरकारशी चर्चा मे महिन्यात पुन्हा सुरू झाली. कंपनीच्या एका टीमने मोदींच्या अमेरिका भेटीपूर्वी भारताला भेट दिली.

ही योजना पुढे गेल्यास मोदी सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाला मोठी चालना मिळेल. मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत अॅपलच्या विक्रेत्यांसह इतर कंपन्या देशांतर्गत उत्पादनात मोठी गुंतवणूक करत आहेत. त्यात आता टेस्लाची भर पडणार आहे. त्याचप्रमाणे यातून देशात रोजगार, निर्यातीची नवी कवाडे खुली होतील.

विभाग

पुढील बातम्या