मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Elon musk office : एलाॅन मस्क पुण्यावर झाला फिदा! पुण्यातील 'या भागात' लीजवर घेतले ऑफिस, ११.६५ लाख रुपये मासिक भाडे

Elon musk office : एलाॅन मस्क पुण्यावर झाला फिदा! पुण्यातील 'या भागात' लीजवर घेतले ऑफिस, ११.६५ लाख रुपये मासिक भाडे

Aug 03, 2023, 12:01 PM IST

    • Elon musk office in Pune : एलाॅन मस्कने पुण्यात टेस्ला कंपनीसाठी या भागात एक ऑफिस लीजवर घेतले आहे. त्यासाठी मासिक भाडे ११.६५ लाख रुपये असेल. वार्षिक आधारावर या लीजच्या रकमेत वाढ होणार आहे.
elon musk HT

Elon musk office in Pune : एलाॅन मस्कने पुण्यात टेस्ला कंपनीसाठी या भागात एक ऑफिस लीजवर घेतले आहे. त्यासाठी मासिक भाडे ११.६५ लाख रुपये असेल. वार्षिक आधारावर या लीजच्या रकमेत वाढ होणार आहे.

    • Elon musk office in Pune : एलाॅन मस्कने पुण्यात टेस्ला कंपनीसाठी या भागात एक ऑफिस लीजवर घेतले आहे. त्यासाठी मासिक भाडे ११.६५ लाख रुपये असेल. वार्षिक आधारावर या लीजच्या रकमेत वाढ होणार आहे.

Elon musk office in Pune : भारतात आपल्या टेस्लाच्या विस्तारीकणाच्या योजनेतील एक भाग म्हणून एलाॅन मस्कने पुण्याच्या विमाननगर भागातील पंजजन्य बिझनेस पार्क येथे एक जागा लीजवर घेतली आहे. टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जागा भाडेतत्वावर खरेदीचा हा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

टेस्लाची भारतातील सहाय्यक कंपनीकडून पाच वर्षांसाठी आँफिससाठी लीजवर जागा खरेदीचा निर्णय घेतला आहे. टेस्लाने पंचशील बिझनेस पार्कच्या बी विंगममधील पहिल्या मजल्यावर ५५८० चौ. फुट क्षेत्रफळात आँफिसची जागा निश्चित केली आहे. ही डील टेबलस्पेस टेक्नाॅलाॅजीज प्रायव्हेट लिमिटेडसह झाली आहे. याचे भाडे १ आँक्टोबर २०२३ पासून सुरू होईल. दोन्ही कंपन्यांमध्ये वार्षिक ५ टक्के भाडे वाढीसह ३६ महिन्यांच्या लाॅक इन कालावधीवर सहमती झाली आहे, गरज पडल्यास टेस्ला पुढील पाच वर्षांपर्यंत लीजमध्ये वाढ करु शकते.

रियल इस्टेट एनालिटिक्स फर्म सीआरई मॅट्रिक्सच्या मते हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टेस्ला ६० महिन्यांच्या कालावधीसाठी भाड्याने घेण्यासाठी ११.६५ लाख रुपये मासिक भाडे आणि ३४,९५ लाख रुपये सिक्सूरिटी डिपाॅझीट्स म्हणून देईल. वास्तविक पंचशील बिझनेस पार्क अजूनही अपूर्णावस्थेत आहे. त्याचे क्षेत्रफळ १०,७७,१८१ चौ.फूट आहे. ही जागा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून किमान ३ किमी अंतरावर आहे.

दरम्यान, भारत सरकार टेस्लाच्या परदेशी पुरवठादारांना, विशेषतः चिनी पुरवठादारांना देशात उत्पादन करण्याची परवानगी देऊ शकते. सरकारने याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केलेली नाही. टेस्लाने २०१९ मध्ये बेंगळुरूमध्ये आपली भारतीय उपकंपनी नोंदणी केली होती. याशिवाय देशात इलेक्ट्रिक वाहने आणि ईव्ही बॅटरी बनवण्यासाठी कारखाना उभारण्याची योजना आखण्यात आली होती.

विभाग

पुढील बातम्या