मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Droneacharya IPO : ‘ड्रोनआचार्य’च्या शेअरचे उड्डाण! पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

Droneacharya IPO : ‘ड्रोनआचार्य’च्या शेअरचे उड्डाण! पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

Dec 23, 2022, 12:59 PM IST

    • Droneacharya IPO :  ड्रोनद्वारे तुम्हाला जर कोणी घरपोच जेवण दिले तर…आश्चर्य वाटेल पण तंत्रज्ञानातील ड्रोन क्रांतीने हे भविष्यात शक्य होणार आहे. कारण पुण्यातील ड्रोनआचार्य या कंपनीचा आयपीओ आज शेअर बाजारात नोंदणीकृत झाला आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 
Drone_HT

Droneacharya IPO : ड्रोनद्वारे तुम्हाला जर कोणी घरपोच जेवण दिले तर…आश्चर्य वाटेल पण तंत्रज्ञानातील ड्रोन क्रांतीने हे भविष्यात शक्य होणार आहे. कारण पुण्यातील ड्रोनआचार्य या कंपनीचा आयपीओ आज शेअर बाजारात नोंदणीकृत झाला आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

    • Droneacharya IPO :  ड्रोनद्वारे तुम्हाला जर कोणी घरपोच जेवण दिले तर…आश्चर्य वाटेल पण तंत्रज्ञानातील ड्रोन क्रांतीने हे भविष्यात शक्य होणार आहे. कारण पुण्यातील ड्रोनआचार्य या कंपनीचा आयपीओ आज शेअर बाजारात नोंदणीकृत झाला आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

Droneacharya IPO : येत्या काही दिवसांत तुमचे ऑर्डर केलेले जेवण, कपडे आणि इतर वस्तू ड्रोनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतील. ड्रोनद्वारे दुर्गम भागात औषधे पोहोचवली जातील.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

कीटकनाशकांच्या फवारणीपासून ते मोठ्या प्रमाणात शेतात पेरणी करण्यापर्यंतची कामे ड्रोनद्वारे केली जाणार आहेत. सरकारी कामांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय बरीच कामे ड्रोनद्वारे केली जातील.

म्हणजेच ड्रोन उद्योग हा आगामी काळात वेगाने उदयास येणारा उद्योग असणार आहे. या क्षेत्राशी संबंधित एक स्टार्टअप म्हणजे 'ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन'. ही कंपनी अशा ड्रोनवर काम करत आहे ज्याचे तंत्रज्ञान जगातील मोजक्याच कंपन्यांकडे आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून हे ड्रोन सहज चालवता येतील.

शेअर्सला ५ टक्के वाढीसह अप्पर सर्कीट

या कंपनीचा आयपीओ आज बीएसई एसएमई एक्सचेंजमध्ये १०२ रुपये प्रति शेअर या दराने सूचीबद्ध झाला. जे त्याच्या ५४ प्रति शेअरच्या इश्यू किंमतीपेक्षा सुमारे ९०% जास्त आहे. सूचीबद्ध झाल्यानंतर शेअरची किंमत ५% अप्पर सर्किटसह रु. १०७.१० वर पोहोचली. समभागानेही ९६.९० रुपयांची नीचांकी पातळी गाठली. आता तो १०७.१० च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

हा एसएमई आयपीओ १३-१५ डिसेंबर दरम्यान ६२.९ लाख समभागांसाठी खुला झाला होता. ३४ कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या तुलनेत कंपनीला २४३.७० पट म्हणजे ६००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मागणी प्राप्त झाली. बॉलीवूड अभिनेते आमिर खान आणि रणबीर कपूर यांनीही आयपीओपूर्व फेरीत काही भागभांडवल विकत घेतले आहे.

कंपनीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती

ड्रोनआचार्य ही पुण्यातील स्टार्टअप कंपनी असून ती अंदाजे ५ वर्षांहून स्थापन झाली. त्याचे संस्थापक प्रतीक श्रीवास्तव आहेत. ही कंपनी प्रामुख्याने ड्रोन पायलट प्रशिक्षण, ड्रोन सेवा आणि ड्रोन निर्मिती या तीन महत्त्वाच्या घटकांवर काम करते.

कंपनीने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी परवाना घेतला आहे. डीजीसीए प्रमाणित वैमानिक २५ किलो वजनाचे कोणतेही ड्रोन उडवू शकतात. हे प्रमाणपत्र १० वर्षांसाठी आहे. एका अंदाजानुसार येत्या काही दिवसांत देशात १ लाखांहून अधिक ड्रोन पायलटची गरज भासणार आहे.

सेवेत ड्रोन उडवून डेटा गोळा केला जातो. यानंतर, ग्राहकांच्या मागणीनुसार डेटाचे मॉडेलिंग दिले जाते. ड्रोनद्वारे गोळा करण्यात येणाऱ्या डेटामध्ये पिकांची वाढ, पिकांचे आरोग्य, रस्ते बांधणीची प्रगती यांचा समावेश होतो. कंपनी कार्बन फायनान्सवर जागतिक बँकेच्या प्रकल्पावरही काम करत आहे.

तर दुसरीकडे कंपनी पुढील आर्थिक वर्षापासून उत्पादन सुरू करेल. कंपनी सध्या एका ड्रोनवर काम करत आहे, जे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून ऑपरेट करता येते. याशिवाय २४ * 7 हवेत राहून काम करु शकतील, हवेत राहून लाइव्ह फीड देऊ शकतील, असेही ड्रोन्स बनवण्यात येणार आहेत. कंपनी अंडरवॉटर ड्रोन आणि अंडरग्राउंड ड्रोनवरही काम करत आहे.

विभाग

पुढील बातम्या