मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Cowin Portal Data Leak : कोवीन पोर्टल लीक झाल्याचा दावा, लाखो लोकांचे आधार,पॅन, व्होटर आयडी डिटेल्स पडले वाऱ्यावर

Cowin Portal Data Leak : कोवीन पोर्टल लीक झाल्याचा दावा, लाखो लोकांचे आधार,पॅन, व्होटर आयडी डिटेल्स पडले वाऱ्यावर

Jun 13, 2023, 12:04 PM IST

    • Cowin Portal Data Leak : कोवीन पोर्टलवर नोंदणीकृत झालेल्या लोकांची खाजगी माहिती लीक झाली आहे. याआधी २०२१ आणि २०२२ मध्येही वैयक्तिक डाटा लीक झाल्याचा दावा करण्यात आला होता.
Cowin portal HT

Cowin Portal Data Leak : कोवीन पोर्टलवर नोंदणीकृत झालेल्या लोकांची खाजगी माहिती लीक झाली आहे. याआधी २०२१ आणि २०२२ मध्येही वैयक्तिक डाटा लीक झाल्याचा दावा करण्यात आला होता.

    • Cowin Portal Data Leak : कोवीन पोर्टलवर नोंदणीकृत झालेल्या लोकांची खाजगी माहिती लीक झाली आहे. याआधी २०२१ आणि २०२२ मध्येही वैयक्तिक डाटा लीक झाल्याचा दावा करण्यात आला होता.

Cowin Portal Data Leak : लोकांचा खाजगी डेटा लीक झाल्याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये भारतीय नागरिकांची वैयक्तीक माहिती, आधार कार्ड, पॅनकार्डची माहिती मेसेजिंग प्लॅटफाॅर्म टेलिग्रामवर उपलब्ध आहेत. अनेक मिडिया रिपोर्टमध्येही असाच दावा करण्यात आला आहे. कोविड काळात लसीकरण मोहिमेसाठी सुरु करण्यात आलेल्या कोवीन अॅपमध्ये नोंदणीकृत नागरिकांची माहिती लीक झाल्याचे म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

DHFL Scam : ३४ हजार कोटींचा बँक घोटाळा; CBI कडून DHFL चे माजी संचालक धीरज वाधवानला अटक

highest fd rates : 'या' चार बँका देतायत एफडीवर सर्वाधिक व्याज; तुमची एफडी कुठं आहे?

Stocks to buy : पुढच्या महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात हे १० शेअर, तुमच्याकडं आहेत का?

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

मल्याळ मनोरमा या सकाळच्या वृत्तपत्राचा हवाला देत मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की CoWIN पोर्टलवर कोविड लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या लोकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. पोर्टलवर लसीकरणासाठी यूजर्सनी नोंदणी केलेल्या पॅनकार्ड, आधार कार्डची माहिती लीक होत असल्याचा दावा केला जात आहे.

रिपोर्टनुसार, या मोठ्या डेटा ब्रीचमुळे भारतीय नागरिकांचे आधार कार्ड, व्होटर आयडी आणि पॅन कार्डशी संबंधित वैयक्तिक तपशील टेलिग्रामवर उपलब्ध आहेत. डेटा लीक झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, सरकारी सूत्राकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.

यापूर्वी २०२१ मध्ये लोकांच्या आधार पॅनचा तपशील लीक होईल असे सांगण्यात आले होते. तर, २०२२ मध्येही कोविनवर नोंदणीकृत लोकांचा वैयक्तिक डेटा लीक झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सरकारने ते दावे फेटाळून लावले होते.

सरकारने या वृत्ताचा केला इन्कार 

सरकारने कोवीन अॅपवरील माहिती सुरक्षित आहे आणि कोणत्याही हॅकर्सद्वारे माहिती हॅक झाली नसल्याचे म्हटले आहे. कोवीनमधील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि केले जातील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. 

विभाग

पुढील बातम्या