मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jet Airways CBI Raid: जेट एअरवेज व उद्योगपती नरेश गोयल यांच्याशी संबंधित ७ ठिकाणी सीबीआयचे छापे

Jet Airways CBI Raid: जेट एअरवेज व उद्योगपती नरेश गोयल यांच्याशी संबंधित ७ ठिकाणी सीबीआयचे छापे

May 06, 2023, 12:08 PM IST

  • Jet Airways CBI Raid : जेट एअरवेजच्या आवारात आणि एअरलाइनचे संस्थापक नरेश गोयल यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापे टाकले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) ५३८ कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करत आहे.

jet airways HT

Jet Airways CBI Raid : जेट एअरवेजच्या आवारात आणि एअरलाइनचे संस्थापक नरेश गोयल यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापे टाकले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) ५३८ कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करत आहे.

  • Jet Airways CBI Raid : जेट एअरवेजच्या आवारात आणि एअरलाइनचे संस्थापक नरेश गोयल यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापे टाकले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) ५३८ कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करत आहे.

Jet Airways CBI Raid: सीबीआयने रोख फसवणूकीप्रकरणी जेट एअरवेज आणि कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांच्या कार्यालयावर छापे टाकले. रिपोर्टनुसार, ५३८ कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणात सीबीआयने ही तपास प्रक्रिया सुरू केली आहे. कॅनरा बँकेने रोख रकमेची फेरफार केल्याची तक्रार केल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात जेट एअरवेजचे संस्थापक, त्यांची पत्नी आणि माजी संचालकांना आरोपी करण्यात आले आहे. याआधीही फसवणूक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बायजूस आणि मणप्पुरम फायनान्सच्या जागेवर छापे टाकले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने शुक्रवारी ५३८ कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीप्रकरणी जेट एअरवेज आणि तिचे संस्थापक नरेश गोयल यांच्या कार्यालयांसह सात ठिकाणी छापे टाकले. छाप्यांदरम्यान सीबीआयने मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झडती घेतली. सीबीआयने संस्थापक नरेश गोयल तसेच त्यांची पत्नी अनिता आणि माजी एअरलाइन डायरेक्टर गौरांग आनंद शेट्टी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयातील कागदपत्रांची झडती घेतली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, नरेश गोयल यांची पत्नी अनिता गोयल आणि इतरांना फसवणूक प्रकरणात आरोपी करण्यात आले होते.

सीबीआयने सांगितले की, कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून ५३८ कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीचा नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेट एअरवेजने नुकतेच दिवाळखोरी जाहीर केली होती, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) मध्ये दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत जालान कॅलरॉक कन्सोर्टियमने ही कंपनी अधिग्रहित केली आहे.

विभाग

पुढील बातम्या