मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Canara Bank : कॅनरा बँकेची कर्जे महागली, कर्जदारांवर पडणार अधिक EMI चा बोजा

Canara Bank : कॅनरा बँकेची कर्जे महागली, कर्जदारांवर पडणार अधिक EMI चा बोजा

Apr 12, 2023, 03:08 PM IST

    • Canara Bank : कॅनरा बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. परिणामी कर्जे महागली असून दरवाढ आजपासून लागू झाली आहेत.. 
canara bank HT

Canara Bank : कॅनरा बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. परिणामी कर्जे महागली असून दरवाढ आजपासून लागू झाली आहेत..

    • Canara Bank : कॅनरा बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. परिणामी कर्जे महागली असून दरवाढ आजपासून लागू झाली आहेत.. 

Canara Bank :  कॅनरा बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) वाढवला आहे. यामुळे, ६ महिन्यांच्या आणि एका वर्षाच्या कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये वाढ झाली आहे, अशा परिस्थितीत एमसीएलआरशी जोडलेल्या कर्जावरील व्याजदरात वाढ होईल. परिणामी कर्जदारांना जास्त ईएमआय भरावा लागेल.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

कॅनरा बँकेने १२ एप्रिलपासून नवीन व्याजदर लागू केले आहेत.

कॅनरा बँकेने १२ एप्रिल २०२३ पासून म्हणजेच आजपासून मार्जिनल काॅस्ट आँफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्समध्ये वाढ केली आहे. कॅनरा बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेने एमसीएलआर दर सहा महिने आणि एक वर्षाच्या कालावधीसाठी वाढवला आहे. त्यात ५ बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे.त्यानुसार सहा महिने आणि एक वर्षाच्या कालावधीसाठी नवीन MCLR दर अनुक्रमे ८.४५% आणि ८.६५% आहे. बँकेने इतर कालावधीसाठी MCLR दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

रेपो दरात कोणताही बदल नसतानाही आरबीआयने व्याजदरात वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत प्रमुख धोरण दरात व्याजदरात कोणतीही वाढ झालेली नाही. पण तरीही कॅनरा बँकेने एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. याउलट एचडीएफसी बँकेने काही कालावधीसाठी एमसीएलआर दर वाढवण्याऐवजी कमी करून कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे.

या व्याजदर वाढीचा फटका एमसीएलआरशी निगडित कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना होणार आहे. यात गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या कर्जदारांचा समावेश असून त्यांना व्याजापोटी अधिक ईएमआय भरावा लागणार आहे.

विभाग

पुढील बातम्या