मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Byjus inspection : बायजूच्या अडचणी वाढल्या ! बुक्स अकाऊंट्सची चौकशी करण्याचे सरकारचे आदेश

Byjus inspection : बायजूच्या अडचणी वाढल्या ! बुक्स अकाऊंट्सची चौकशी करण्याचे सरकारचे आदेश

Jul 11, 2023, 05:15 PM IST

    • byjus account books : देशाच्या काॅर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने एडटेक कंपनी बायजूच्या अकाऊंट्स बुक्सची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. काॅर्पोरेट गव्हर्नन्स कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप कंपनीवर आहेत.
byjus ceo Ravindran HT

byjus account books : देशाच्या काॅर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने एडटेक कंपनी बायजूच्या अकाऊंट्स बुक्सची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. काॅर्पोरेट गव्हर्नन्स कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप कंपनीवर आहेत.

    • byjus account books : देशाच्या काॅर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने एडटेक कंपनी बायजूच्या अकाऊंट्स बुक्सची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. काॅर्पोरेट गव्हर्नन्स कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप कंपनीवर आहेत.

Byjus inspection : : देशाच्या काॅर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने एडटेक कंपनी बायजूच्या अकाऊंट्स बुक्सची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. काॅर्पोरेट गव्हर्नन्स कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप कंपनीवर आहेत. या प्रकरणाशी संबंधित लोकांचा हवाला देत सहा आठवड्यात अहवाल मागवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

एका मिडिया रिपोर्टमध्ये ८ जुलैला काॅर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या गंभीर फसवणूक तपास कार्यालयाने (एसएफआयओ) बायजूच्या विरोधात चौकशी सुरु केली आहे. काॅर्पोरेट मंत्रालयानेही एसएफआयओने गोळा केलेल्या कायदेशीर पुराव्यांचे गेल्या काही दिवसांपासून सखोल परिक्षण सुरु केले असल्याची माहिती एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

दरम्यान, बायजू कंपनीने काॅर्पोरेट गव्हर्नन्स कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप फेटाळला आहे. याच SFIO च्या अहवालातील निष्कर्ष कंपनीने फेटाळून लावले आहेत. कंपनीला SFIO कडून अद्याप अशा आशयाचे कोणतेही पत्र मिळालेले नसल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने मिंटला सांगितले.

सीए फायनान्शियल रिपोर्टिंग रिव्ह्यू बोर्डाने (FRRB) २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन आर्थिक वर्षांसाठी बायजूच्या आर्थिक विवरणांचे पुनरावलोकन केल्यानंतर हा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले .

दरम्यान, जूनमध्ये, पीक एक्सव्ही पार्टनर्सचे जीव्ही रविशंकर (सेक्वोया कॅपिटल इंडिया), प्रोससचे रसेल ड्रेसेनस्टॉक आणि चॅन झुकरबर्ग इनिशिएटिव्हचे व्हिव्हियन वू - तीन संचालकांनी बायजूच्या बोर्डातून नाव काढून घेतले. या सदस्यांनी कंपनीचे संस्थापक रवींद्रन यांच्याशी मतभेद असल्याचे नमूद केले.

कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या समस्यांवरील वाढत्या प्रतिक्रियेल लगाम घालण्यासाठी बायजूने आता बोर्ड सल्लागार समिती (BAC) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

बायजूचे रवींद्रन यांना बोर्ड रचना आणि प्रशासन रचना याविषयी सल्ला देण्यासाठी बीएसीची स्थापना करण्यात आली होती. बुधवारी, रवींद्रन यांनी ईजीएममध्ये भागधारकांना सांगितले की, बीएसी विविध कॉर्पोरेट क्षेत्रातील संबंधित अनुभव असलेल्या स्वतंत्र संचालकांचा समावेश असलेला एक कार्यकारी गट म्हणून काम करण्याची शक्यता आहे.

पुढील बातम्या