मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Diwali Offers : सोनं खरेदी करणाऱ्यांवर ऑफर्सचा पाऊस, एक पैसाही खर्च न करता कार जिंकण्याची संधी

Diwali Offers : सोनं खरेदी करणाऱ्यांवर ऑफर्सचा पाऊस, एक पैसाही खर्च न करता कार जिंकण्याची संधी

Nov 07, 2023, 05:51 PM IST

  • Offers on gold shopping on Dhantrayodashi : दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या निमित्तानं सोने खरेदी करणाऱ्यांना खूषखबर आहे.

Diwali Offers and discount on gold shopping

Offers on gold shopping on Dhantrayodashi : दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या निमित्तानं सोने खरेदी करणाऱ्यांना खूषखबर आहे.

  • Offers on gold shopping on Dhantrayodashi : दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या निमित्तानं सोने खरेदी करणाऱ्यांना खूषखबर आहे.

Diwali offers on Gold shopping : सणवार आणि खरेदी हे समीकरणच असतं. त्यातही दिवाळी म्हणजे सणांचा राजा. या काळात लोकांच्या हाती जास्तीचा पैसा येत असल्यानं खरेदीसाठी झुंबड उडते. हे लक्षात घेऊन विक्रेत्या कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्यावर सवलती आणि बक्षिसांचा वर्षाव करतात. यंदाची दिवाळीही त्यास अपवाद नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

दिवाळीत खासकरून धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोने, चांदी आणि दागिने खरेदी करतात. या ग्राहकांसाठी तनिष्क, ऐश्प्रासारख्या बड्या ब्रँडच्या ज्वेलर्सनी अनेक ऑफर देऊ केल्या आहेत. डिजिटल स्वरूपात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी फोनपेनं ३ हजार रुपयांपर्यंत गॅरंटीड कॅशबॅक ऑफर दिली आहे. ही ऑफर ९ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत लागू असेल.

Bank FD Rates : ७५० दिवसांच्या एफडीवर ९.२१ टक्के व्याज, 'या' बँकेची तगडी ऑफर

ज्वेलरी मेकिंग चार्जेस माफ

'तनिष्क' या ब्रँडनं ग्राहकांना १२ नोव्हेंबरपर्यंत एक खास ऑफर दिली आहे. या अंतर्गत ज्वेलरी मेकिंग चार्जेसवर २० टक्क्यांपर्यंत सूट आहे. तनिष्कच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर ४ हजार रुपयांचं इन्स्टंट डिस्काउंट आहे. ही ऑफर प्रति कार्ड ८० हजार रुपयांच्या खरेदीवर आहे.

ऐश्प्रानं उघडला सवलतींचा पेटारा

Aisshpra Gems and Jewels नं ग्राहकांसाठी सवलतींचा पेटाराच उघडला आहे. या ब्रँडनं येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांना मारुतीची ग्रँड विटारा, बलेनो आणि इग्निस कार जिंकण्यासाठी संधी देत ​​आहे. याशिवाय ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे पाच ग्रॅम सोन्याची १०१ नाणी जिंकण्याची संधी आहे.

ऐश्प्रा आपल्या ग्राहकांना ५० हजार रुपयांच्या प्रत्येक दागिन्यांच्या खरेदीसाठी एक कूपन देईल. हे कूपन म्हणजे लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची संधी असेल. हे कूपन लखनऊ वगळता सर्व Aishpra Gems & Jewels स्टोअर्सच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

philanthropy list 2023: भले शाब्बास! भारतातील 'या' दोन उद्योगपतींनी केलं ३,८१६ कोटीचं दान

सव्वा लाखाच्या खरेदीवर चांदीचं नाणं

महाबीर दनवर ज्वेलर्सनं दिवाळीपर्यंत ज्वेलरी मेकिंग शुल्कावर ७० टक्के सवलत देऊ केली आहे. याशिवाय, सव्वा लाख रुपयांवरील प्रत्येक खरेदीवर एक चांदीचं नाणंही दिलं जात आहे. दिवाळीला लकी ड्रॉद्वारे कंपनीकडून गिफ्ट कूपनची घोषणा केली जाणार आहे.

फोनपेचा कॅशबॅक

फोनपेच्या माध्यमातून प्रमाणित 24K डिजिटल गोल्ड सोन्याची विक्री केली जाते. आतापर्यंत १ कोटींहून अधिक ग्राहकांनी हे उच्च प्रतीचं शुद्ध सोनं खरेदी केलं आहे. या खरेदीवर फोनपेनं कॅशबॅकची ऑफर दिली आहे. किमान १ हजार रुपयांच्या डिजिटल सोने खरेदीवर ही ऑफर एकदाच असेल.

पुढील बातम्या