मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bank of Maharashtra : महाबँकेच्या व्याजदरात वाढ, ग्राहकांवर पडणार अधिक EMI चा भुर्दंड

Bank of Maharashtra : महाबँकेच्या व्याजदरात वाढ, ग्राहकांवर पडणार अधिक EMI चा भुर्दंड

Apr 18, 2023, 02:30 PM IST

    • Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रने एमसीएलआर आधारित कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जधारकांच्या खिशावर बोजा वाढणार असून त्यांना ईएमआयपोटी जास्त रक्कम भरावी लागणार आहे.
bank of maharashtra HT

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रने एमसीएलआर आधारित कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जधारकांच्या खिशावर बोजा वाढणार असून त्यांना ईएमआयपोटी जास्त रक्कम भरावी लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

कर्जावरील नवीन व्याजदर १५ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे कर्जदारांवर अधिक ईएमआयचा बोझा पडणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रने सोमवारी मार्जिनल काॅस्ट आॅफ लेंडिग रेटमध्ये १० बेसिस पाॅईंट्सची वाढ केली आहे. परिणामी बेंचमार्क एक वर्षासाठी १० बेसिस पाॅईंट्सने वाढून ८.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयने एप्रिलमध्ये रेपो दरात वाढ केली नसतानाही बँक ऑफ महाराष्ट्रच्या एमसीएलआर दरात वाढ केल्याने बँकेच्या कर्जधारकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या विविध कालावधींसाठीच्या एमसीएलआरमध्ये वाढ झाल्यामुळे, जवळजवळ सर्व प्रकारच्या कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्ज घेणार्‍या ग्राहकांचा समावेश आहे. बँक आता या कर्जदारांकडून जास्त व्याजदर आकारणार आहे. त्यामुळे कर्जदारांना मासिक हप्त्यापोटी अतिरिक्त रक्कम भरावी लागेल.

विभाग

पुढील बातम्या