मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Five days weekly off of Banks : शनिवारीही बँका बंद ! आता बँकांनाही ५ दिवसांचा आठवडा, ग्राहकांवर ताण

Five days weekly off of Banks : शनिवारीही बँका बंद ! आता बँकांनाही ५ दिवसांचा आठवडा, ग्राहकांवर ताण

Mar 05, 2023, 03:56 PM IST

    • Five days weekly off of Banks : बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून दोन दिवस सुट्टी लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
bank closed HT

Five days weekly off of Banks : बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून दोन दिवस सुट्टी लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

    • Five days weekly off of Banks : बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून दोन दिवस सुट्टी लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

Five days weekly off of Banks : बँकांमध्येही सरसकट पाच दिवसांचा आठवडा सुरु होण्याची शक्यता आहे. भारतीय बँक संघ (आयबीए) बँक संघटनांच्या मागणीवर विचार करत आहे. बँक युनियन संघटनांनी ५ दिवसांचा आठवडा करण्याची मागणी केली आहे. या मागण्यांसाठी बँक यूनियन संघटनांनी अनेकदा आंदोलनाचा पवित्रा उचलला होता.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

वास्तविक बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार - रविवार सुट्टी असते. ही मागणी मान्य झाल्यानंतर सर्वाधिक फटका ग्राहकांना बसणार आहे. कारण शनिवार आणि रविवार बँकांना सुट्टी असल्याने बँकांशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे. .

५ दिवस कामासाठी बँकांना असे करावे लागेल काम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी प्रत्येक दिवशी कामाच्या तासात ५० मिनिटांपर्यंत वाढ केली जाऊ शकते. बँक कर्मचाऱ्यांना सकाळी ९.४५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत दररोज ४० मिनिटे अतिरिक्त काम करावे लागेल.

आरबीआयची परवानगी आवश्यक

भारतीय बँक संघटनेने या मागणीला सैद्धांतिक पद्धतीने सहमती दर्शवली आहे. दरम्यान सरकार आणि रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक आहे. आँल इंडिया बँक आँफिसर्स असोसिएशनचे महासचिव एस नागराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर बँकांमध्ये पाच दिवस कामकाज करण्याचा नियम लागू करायचा असेल तर त्यासाठी सरकारला निगोशिएबल इंन्स्ट्रूमेंट्स अ‍ॅक्टच्या सेक्शन २५ अंतर्गत एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करावे लागेल. सध्या बँकांमध्ये कर्मचाऱ्यांना महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी दिली जाते.

मार्चमध्ये १२ दिवस बँका बंद राहणार

मार्च महिन्यात दुसऱ्या, चौथ्या शनिवार आणि रविवार मिळून १२ दिवस बँका बंद राहणार आहे.. २०२३ मध्ये होळी, चैत्र नवरात्र, रामनवमी सारखे अनेक सणांचा समावेश आहे.

विभाग

पुढील बातम्या