मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing News : 'या' कंपनीच्या आयपीओनं सचिनला केलं मालामाल, IPL च्या सर्वात महागड्या खेळाडूपेक्षाही जास्त कमावले!

IPO Listing News : 'या' कंपनीच्या आयपीओनं सचिनला केलं मालामाल, IPL च्या सर्वात महागड्या खेळाडूपेक्षाही जास्त कमावले!

Dec 28, 2023, 06:30 PM IST

  • Azad Engineering IPO Listing : आझाद इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. हा शेअर मूळ किंमतीपेक्षा वाढून सूचीबद्ध झाल्यानं सचिन तेंडुलकरला मोठा फायदा झाला आहे.

Sachin Tendulkar

Azad Engineering IPO Listing : आझाद इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. हा शेअर मूळ किंमतीपेक्षा वाढून सूचीबद्ध झाल्यानं सचिन तेंडुलकरला मोठा फायदा झाला आहे.

  • Azad Engineering IPO Listing : आझाद इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. हा शेअर मूळ किंमतीपेक्षा वाढून सूचीबद्ध झाल्यानं सचिन तेंडुलकरला मोठा फायदा झाला आहे.

Azad Engineering IPO Listing : क्रिकेटच्या मैदानानंतर आता सचिन तेंडुलकर गुंतवणुकीच्या पीचवरही जोरदार बॅटिंग करत असल्याचं दिसत आहे. हैदराबादच्या आझाद इंजिनीअरिंग या कंपनीत ९ महिन्यांपूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर सचिनला तब्बल ५३१ टक्के परतावा मिळाला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

एअरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा, तेल व वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा आझाद इंजिनीअरिंग ही कंपनी करते. या कंपनीचा आयपीओ आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. मुंबई शेअर बाजारात (BSE) हा शेअर ३५ टक्क्यांहून अधिक वाढीसह ७१० रुपयांवर तर, राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) ३७ टक्क्यांहून अधिक नफ्यासह ७२० रुपयांवर सूचीबद्ध झाला.

आझाद इंजिनीअरिंगचा शेअर प्रीमियमवर सूचीबद्ध झाल्यानं सचिनला तब्बल २६.५ कोटींचा नफा झाला आहे, असं 'इकॉनॉमिक टाइम्स'नं म्हटलं आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक महागड्या ठरलेल्या मिचेल स्टार्कलाही सचिननं कमाईच्या बाबतीत मागं टाकलं आहे. स्टार्कला आयपीएलमध्ये २४.७५ कोटी रुपयांची बोली लागली आहे.

‘पार्ले जी’च्या पाकिटावर चिमुकलीऐवजी इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा फोटो, काय आहे प्रकरण?

सचिनला ४०० टक्क्यांहून जास्त फायदा

सचिन तेंडुलकर यानं याच वर्षी मार्चमध्ये आझाद इंजिनिअरिंगमध्ये ५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरमुळं कंपनीचा आयपीओ बाजारात येण्याआधी सचिनकडं एकूण ४,३८,२१० शेअर होते. त्यानुसार सचिनला एक शेअर ११४.१० रुपयांना पडला. त्यामुळं त्याला भरघोस नफा झाला आहे.

लक्ष्मण, सिंधु, सायना नेहवाल यांनाही फायदा

सचिन बरोबच व्हीव्हीएस लक्ष्मण, बॉक्सिंग चॅम्पियन निखत झरीन, बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांचीही या कंपनीत गुंतवणूक आहे. मात्र, या सर्वांनी सचिनपेक्षा दुप्पट किंमतीत कंपनीचे शेअर खरेदी केले होते. त्यांनी प्रति शेअर २२८.१७ रुपये मोजले होते. तरीही २१५ टक्के फायदा झाला आहे. त्यांच्या १ कोटींच्या गुंतवणुकीचं मूल्य ३.१५ कोटी झालं आहे. 

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या पेट्रोल- डिझेलचे आजचे ताजे दर

८३ पट सबस्क्राइब झाला होता आयपीओ

आझाद इंजिनिअरिंगचा आयपीओ ८३.०४ पट सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत २४.५१ पट, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत (NII) ९०.२४ पट आणि क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) च्या श्रेणीत हा आयपीओ १७९.६४ पट सबस्क्राइब झाला. या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार किमान एक आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावण्याची मुभा होती. त्यासाठी किमान १४६७२ रुपये मोजावे लागणार होते.

 

(डिस्क्लेमर : ही केवळ कंपनीच्या शेअरची माहिती आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या