मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stock : सहा महिन्यांत दुप्पट पैसे दिले, आता बोनस देणार 'ही' कंपनी

Multibagger stock : सहा महिन्यांत दुप्पट पैसे दिले, आता बोनस देणार 'ही' कंपनी

Oct 10, 2023, 12:54 PM IST

  • Avantel ltd bonus shares : अवघ्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना दुप्पट कमाई करून देणाऱ्या अवान्टेल लिमिटेडनं आणखी एक सुखद धक्का दिला आहे.

stock exchange

Avantel ltd bonus shares : अवघ्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना दुप्पट कमाई करून देणाऱ्या अवान्टेल लिमिटेडनं आणखी एक सुखद धक्का दिला आहे.

  • Avantel ltd bonus shares : अवघ्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना दुप्पट कमाई करून देणाऱ्या अवान्टेल लिमिटेडनं आणखी एक सुखद धक्का दिला आहे.

Avantel Ltd : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत कमाईच्या अनेक संधी असतात. एखाद्या कंपनीच्या शेअरचा भाव वाढत नसला तरी लाभांशाच्या माध्यमातून ही कंपनी गुंतवणूकदारांना काही ना काही मोबदला देत असते. मात्र, कधी-कधी शेअरचा भाव वाढत असतानाही कंपन्या लाभांश आणि बोनस देऊन गुंतवणूकदारांना मालामाल करून टाकतात. अवान्टेल लिमिटेडनं गुंतवणूकदारांना असाच सुखद धक्का दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

मागील सहा महिन्यांत अवान्टेल लिमिटेडच्या शेअर्सच्या किमती २०० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. आता कंपनीनं आणखी एक मोठी घोषणा केली आहे. गुंतवणूकदारांना प्रत्येक एका शेअरमागे २ शेअर्स बोनस म्हणून दिले जातील, असं जाहीर करण्यात आलं आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बोनस शेअर्सच्या घोषणेनंतर कंपनीचे शेअर चांगलेच वधारले आहेत. आज बाजार खुला झाल्यापासून अवान्टेलचे शेअर धावत असून सध्या एनएसईवर सुमारे १७ टक्क्यांनी वाढून ट्रेड करत आहेत. तसंच, आजच्या व्यवहारात ३२४.१० पर्यंत मजल मारत कंपनीच्या शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.

एका शेअरमागे २ शेअर

अवान्टेल लिमिटेडनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर पात्र गुंतवणूकदारांना २ शेअर्स बोनस म्हणून दिले जाणार आहेत. बोनस शेअर्ससाठी कंपनीनं अद्याप रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. बोनस शेअर नेमके कुणाला मिळणार आणि कुणाला नाही हे रेकॉर्ड डेटच्या आधारे ठरवलं जाणार आहे.

दुसऱ्यांदा बोनस शेअर

अवान्टेल लिमिटेडनं गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी जून २०२२ मध्ये कंपनीनं १ शेअरसाठी ३ बोनस शेअर्स दिले होते. या कंपनीचे शेअर यंदा ऑगस्ट महिन्यात स्प्लिट झाले होते. एक शेअर ५ भागांमध्ये विभागला गेला. त्यामुळं शेअरचं दर्शनी मूल्य १० रुपयांवरून २ रुपयांवर आलं. ही कंपनी गुंतवणूकदारांना ठराविक वेळेनं लाभांश देत असते.

शेअर बाजारात मजबूत वाटचाल

काल बाजार बंद झाला तेव्हा कंपनीच्या एका शेअरची किंमत २७० रुपये होती. आज हा शेअर ३१५ वर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ३५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी हा शेअर गेल्या ६ महिन्यांपासून खरेदी करून ठेवला आहे, त्यांना २०० टक्के नफा मिळाल आहे. अर्थात, त्यांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

पुढील बातम्या