मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani group stocks : निवडणुकीतील 'मोदी मॅजिक'चे शेअर बाजारात पडसाद, अदानीचे शेअर उसळले!

Adani group stocks : निवडणुकीतील 'मोदी मॅजिक'चे शेअर बाजारात पडसाद, अदानीचे शेअर उसळले!

Dec 04, 2023, 01:21 PM IST

  • Adani Group Shares surge : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे पडसाद शेअर बाजारात उमटत आहेत. अदानी समूहाला याचा मोठा फायदा झाला आहे.

Adani Group stocks after assembly elections results 2023

Adani Group Shares surge : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे पडसाद शेअर बाजारात उमटत आहेत. अदानी समूहाला याचा मोठा फायदा झाला आहे.

  • Adani Group Shares surge : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे पडसाद शेअर बाजारात उमटत आहेत. अदानी समूहाला याचा मोठा फायदा झाला आहे.

Modi magic impact on Share market : लोकसभेची फायनल मानल्या जाणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सरशी झाल्याचे पडसाद शेअर बाजारातही उमटले आहेत. शेअर बाजारात आज तेजी दिसत असून अदानी समूहातील सर्व १० कंपन्यांचे शेअर कमालीचे उसळले आहेत. अदानीमध्ये अलीकडंच गुंतवणूक करणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा झाला असून जुन्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

वर्षाच्या सुरुवातीला हिंडनबर्गच्या रिपोर्टचा अदानी समूहाला मोठा फटका बसला होता. या समूहातील सर्वच शेअर गडगडले होते. त्यातून अदानी समूह सावरत असतानाच विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाची सुखद बातमी आली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.

अदानी ग्रीनच्या गुंतवणूकदारांचे चेहरे खुलले!

मागच्या वर्षभरात ४५ टक्क्यांहून अधिक घसरलेल्या अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये ५ दिवसांत १०.८६ टक्क्यांची वाढ केली आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरनं सुमारे २० टक्के परतावा दिला आहे. अदानी ग्रीनच्या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ४३९.१० रुपये आणि उच्चांकी किंमत २१८५ रुपये आहे. आज हा शेअर सुमारे ९ टक्क्यांनी वाढला आहे.

अदानी पोर्टला मजबुती

अदानी पोर्ट्सचे शेअर्स आज ५.५८ टक्क्यांनी वाढून ८७४ रुपयांवर पोहोचले आहेत. मागच्या ५ दिवसांत हा शेअर ७ टक्क्यांनी वधारला आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९१२ रुपये आहे आणि नीचांक ३९५.१० रुपये आहे. गेल्या एका महिन्यात शेअरनं सुमारे ९ टक्क्क्यांचा परतावा दिला आहे.

अदानी पॉवरनं दाखवली पॉवर 

अदानी पॉवरनं जुन्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. आज हा शेअर ५.७० टक्क्यांनी वाढून ४६५.३५ रुपयांवर ट्रेड करत आहे. गेल्या ५ दिवसांत यात सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली आहे, तर महिनाभरात १८ टक्के परतावा दिला आहे. मागच्या वर्षभरात अदानी पॉवरच्या शेअरनं ४४ टक्के आणि चालू वर्षात आतापर्यंत ५६ टक्के परतावा दिला आहे.

अदानी टोटल गॅसचा शेअर मागच्या महिन्यापासून सातत्यानं वधारत आहे. या कालावधीत त्यात ३३.४१ टक्के वाढ झाली आहे. आज हा शेअर ४.६७ टक्क्यांनी वाढून ७३४.२० रुपयांवर ट्रेड करत आहे. 

अदानी एन्टरप्रायझेसचा शेअर आज ७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून २५३९ रुपयांवर व्यवहार करत आहेत. मागच्या एका महिन्यात या शेअरनं ११.६२ टक्के परतावा दिला आहे. मात्र, गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांचं ३६ टक्क्यांचं नुकसान झालं आहे.

अदानी समूहातील सर्वाधिक गडगडलेल्या अदानी विल्मरनं गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांचं सुमारे ४३ टक्के नुकसान केलं आहे. हळूहळू हा शेअर सावरत आहे. आज हा शेअर २.७० टक्क्यांनी वाढून ३४९.४५ रुपयांवर व्यवहार करत आहे.

एका आठवड्यात २४ टक्क्यांची उसळी

तब्बल ६७ टक्क्यांनी घसरून ९०५.९५ पर्यंत घसरलेला अदानी एनर्जी सोल्युशन्स हा शेअर आज ६ टक्क्यांनी वाढून ९०८.९५ रुपयांवर ट्रेड करत आहे. मागच्या एका आठवड्यात या शेअरमध्ये २४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

अंबुजा सिमेंटचा भावही आज ५.४२ टक्क्यांनी वाढून ४६६.१० रुपयांवर पोहोचला आहे. एनडीटीव्ही देखील आज ३.६३ टक्क्यांनी वाढून २२७.०५ रुपयांवर आहे. २३ नोव्हेंबरपासून यात सुमारे १८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

पुढील बातम्या