मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ATM Uses : एटीएमचा फायदाच फायदा, पैसे काढण्याशिवाय एटीएममधून ‘या’ १० गोष्टी करता येतात

ATM Uses : एटीएमचा फायदाच फायदा, पैसे काढण्याशिवाय एटीएममधून ‘या’ १० गोष्टी करता येतात

Aug 21, 2023, 05:16 PM IST

    • ATM Uses : एटीएममधून पैसे काढण्याव्यतिरिक्त इतरही बिगर वित्तीय सेवांचा लाभ घेता येऊ शकतो. त्यामुळेच ग्राहकांची संख्या कमी होऊनही अनेक बँका आता एटीएमच्या शाखा उघडत आहेत.
ATM HT

ATM Uses : एटीएममधून पैसे काढण्याव्यतिरिक्त इतरही बिगर वित्तीय सेवांचा लाभ घेता येऊ शकतो. त्यामुळेच ग्राहकांची संख्या कमी होऊनही अनेक बँका आता एटीएमच्या शाखा उघडत आहेत.

    • ATM Uses : एटीएममधून पैसे काढण्याव्यतिरिक्त इतरही बिगर वित्तीय सेवांचा लाभ घेता येऊ शकतो. त्यामुळेच ग्राहकांची संख्या कमी होऊनही अनेक बँका आता एटीएमच्या शाखा उघडत आहेत.

ATM Uses : जर तुम्ही दररोज एटीएमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एटीएम म्हणजे आॅटोमेटेड टेलर मशीन (ATM) द्वारे आर्थिक व्यवहार करण्याव्यतिरिक्त इतरही बिगर वित्तीय व्यवहार केले जाऊ शकतात. त्यामुळेच ग्राहकांची संख्या कमी होण्याव्यतिरिक्त बँका अजूनही एटीएमच्या शाखा उघडत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अकाऊंट बॅलन्सची मिळेल माहिती

एटीएमद्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम आणि डेबिट क्रेडिट ट्रॅन्झॅक्शनचे मिनी स्टेटमेंट काढू शकतात. मिनी स्टेटमेंटद्वारे तुम्हाला गेल्या १० ट्रॅन्झॅक्शनची माहिती मिळू शकते.

कार्ड टू कार्ड ट्रॅन्झॅक्शन

एसबीआयच्या संकेतस्थळानुसार, ग्राहक एका डेबिट कार्डातून दुसऱ्या डेबिट कार्डात पैसे पाठवू शकतात. ही एक मोफत सेवा आहे. यात दररोज ४० हजार रुपयांपर्यंत पैसे जमा करण्याची मुभा आहे. यासाठी तुम्हाला तुमचे डेबिट, क्रेडिट आणि लाभार्थ्यांचे डेबिट अथवा क्रेडिट कार्ड नंबर असणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्ड पेमेंट

कोणत्याही व्हिसा क्रेडिट कार्डाचे बिल पेमेंट करण्यासाठी एटीएमचा वापर करता येतो. तुमच्या क्रेडिट कार्ड बिलाचे पेपरलेस पेमेंट करता येते.

प्रिमियम भरा

कोणत्याही बँकेचे एटीएम वापरून तुम्ही कोणत्याही जीवन विमा कंपन्यांचा प्रिमियम भरू शकतात. त्यासाठी केवळ पाॅलीसी क्रमांकाची गरज असेल.

घरबसल्या चेक बूक आॅर्डर करा

कोणत्याही बँक शाखेच्या एटीएमच्या माध्यमातून चेक बूक आॅर्डर करू शकतात. त्यासाठी रजिस्टर्ड अॅड्रेस बदलणे गरजेचे आहे. कारण चेक बूक दिलेल्या पत्त्यावरच पाठवले जाते.

एटीएमपासून मिळेल डीसीसीची सुविधा

एचडीएफसी बँकेच्या मते, डायनॅमिक करन्सी कन्व्हर्जन (डीसीसी) सुविधेंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार करता येतो.

मोबाईल बँकिंगसाठी रजिस्ट्रेशन

एटीएमद्वारे मोबाईल बँकिंगसाठी रजिस्ट्रेशन करता येते. आणि मोबाईल बँकिंग सेवेचा लाभही घेता येतो.

एटीएममधून पीन बदल

कोणत्याही एटीएममधून तुम्ही डेबिट कार्ड पीन बदलू शकतात. नियमित कालावधीनंतर तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येईल.

लिमिटपेक्षा अतिरिक्त व्यवहारावर शुल्क

बँक आपल्या लिमिटपेक्षा अधिक बिगर बँकिंग व्यवहार करण्यासाठी शुल्क आकारतात. एचडीएफसी बँकेचे शुल्क ८.५० रुपये आहे. त्यात टॅक्सचाही समावेश आहे. आयसीआयसीआय बँकेत असे व्यवहार निशुल्क आहेत. एसबीआय ग्राहकांकडून ५ रुपये आणि इतर बँकांच्या एटीएममधून व्यवहार केल्यास ८ रुपये शुल्क आकारले जाते.

विभाग

पुढील बातम्या