मराठी बातम्या  /  बिझनेस  /  सेम टू सेम आनंद महिंद्रा.. उद्योगपतीने स्वतःच ट्विट करून म्हटलं जत्रेत हरवलेला भाऊ सापडला!

सेम टू सेम आनंद महिंद्रा.. उद्योगपतीने स्वतःच ट्विट करून म्हटलं जत्रेत हरवलेला भाऊ सापडला!

Nov 14, 2023, 07:07 PM IST

  • Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Anand Mahindra

Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Anand Mahindra : असं म्हणतात की, जगात एकाच चेहऱ्याची व कदकाठीची सात माणसं असतात. आता महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आणि भारतातील सर्वात नामांकित उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत असतता. तसेच ते सोशल मिडियावर अनेकांशी संवाद साधत असतात.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत या व्हायरल फोटोवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सेम टू सेम आनंद महिंद्रा यांच्या सारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती आनंद महिंद्रा यांचा जुळा भाऊ असल्याचा म्हणत हा फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

@pjdaddyofficial नावाच्या एक्स अकाऊंटवरुन आनंद महिंद्रा यांच्यासारखा दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी हा फोटो पाहिला असून २५६ लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे. तर शेकडो लोकांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

या फोटोतील व्यक्ती सेम टू सेम आनंद महिंद्रा यांच्यासारखी दिसत आहे. पीजे नावाच्या व्यक्तीने त्याच्या एका सहकाऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी आनंद महिंद्रा यांनाही टॅग केले. या व्यक्तीला पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा माझा पुण्याचा सहकारी आहे जो आनंद महिंद्रासारखा दिसतो असे कॅप्शन या व्यक्तीने या फोटोला दिले आहे.

फोटो शेअर करताना पीजे नावाच्या व्यक्तीने आनंद महिंद्रा यांनाही टॅग केले होते. यावर आनंद महिंद्रा यांनीही अगदी गमतीशीर रिप्लाय केला आहे. लहानपणी आम्ही जत्रेत हरवलो होतो असंच हा फोटो पाहून वाटतं असल्याचे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

विभाग

पुढील बातम्या