मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Anand Mahindra: आयुष्य सुंदर आहे! ऋषी सुनक यांच्याबद्दलचं आनंद महिंद्रांचं ट्वीट व्हायरल

Anand Mahindra: आयुष्य सुंदर आहे! ऋषी सुनक यांच्याबद्दलचं आनंद महिंद्रांचं ट्वीट व्हायरल

Oct 25, 2022, 06:46 PM IST

  • Anand Mahindra on Rishi Sunak: भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील.त्यांच्या निवडीवर महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Rushu Sunak HT

Anand Mahindra on Rishi Sunak: भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील.त्यांच्या निवडीवर महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • Anand Mahindra on Rishi Sunak: भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील.त्यांच्या निवडीवर महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Anand Mahindra on Rishi Sunak: भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असणार आहेत. ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचा पंतप्रधान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासह जगभरातील नेत्यांनी सुनक यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आणि दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे एक ट्विट खूप व्हायरल होत आहे

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल जगभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आणि दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे एक ट्विट खूप व्हायरल होत आहे. आपल्या ट्विटमध्ये महिंद्राने ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या विधानाचा संदर्भ दिला आहे. चर्चिल यांनी हे विधान १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळणार असताना केले होते. मग त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची खिल्ली उडवली आणि सर्व भारतीय नेत्यांना स्तरहीन आणि शक्तीहीन म्हटले. पण काळाचं चक्र आज फिरलंय त्याच ब्रिटनमध्ये आज एक भारतीय वंशाचा पंतप्रधान होणार आहे, ही बाब तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.

महिंद्रा यांनी ट्विट केले की, '१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने विन्स्टन चर्चिल म्हणाले होते की सर्व भारतीय नेते हीन आणि नैतिकदृष्ट्या कमकुवत असतील. आज आपल्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी आपण भारतीय वंशाच्या व्यक्तीला ब्रिटनच्या पंतप्रधानपदी पाहण्यास तयार आहोत. आयुष्य सुंदर आहे.' महिंद्राचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. आतापर्यंत २००० हून अधिक युजर्सनी त्याला प्रतिसाद केले आहे. १३,७०० लोकांनी रिट्विट केले आहे आणि ८४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. महिंद्राचे ट्विटरवर जवळपास १० दशलक्ष फॉलोअर्स आहेत. भारत स्वतंत्र झाला तेव्हा क्लेमेंट अॅटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते.

 

भारताशी संबंध

ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीने ऋषी सुनक यांची नेता म्हणून निवड केली आहे. किंग्ज चार्ल्सची मान्यता मिळाल्यानंतर सुनक औपचारिकपणे पुढील पंतप्रधान होतील. सुनक हे पहिले पंतप्रधान असतील ज्यांची मुळे भारताशी निगडीत आहेत. त्यांचे आजोबा पंजाबचे होते. १९६० च्या दशकात ते पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले. सुनक यांनी ऑक्सफर्ड आणि स्टॅनफोर्ड सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले आहे. कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेत असताना सुनकची अक्षता मूर्तीशी भेट झाली. अक्षता आणि ऋषी यांचे ऑगस्ट २००९ मध्ये लग्न झाले आणि या जोडप्याला दोन मुली आहेत. अक्षता ही देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे.

पुढील बातम्या