मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Air India Maharaja : 'महाराजा' 'एअर इंडिया'ला करणार कायमचा 'टाटा', कंपनी करणार हा महत्त्वपूर्ण बदल

Air India Maharaja : 'महाराजा' 'एअर इंडिया'ला करणार कायमचा 'टाटा', कंपनी करणार हा महत्त्वपूर्ण बदल

Jul 26, 2023, 12:08 PM IST

    • Air India Maharaja : एअर इंडियाची ओळख असलेल्या महाराजाला टाटा ग्रुप कायमचा टाटा करण्याची शक्यता आहे. टाटा समुहाने गेल्या वर्षी एअर इंडियाची खरेदी केल्यानंतर त्यात अनेक नवे बदल केले जात आहेत.
Air India Maharaja HT

Air India Maharaja : एअर इंडियाची ओळख असलेल्या महाराजाला टाटा ग्रुप कायमचा टाटा करण्याची शक्यता आहे. टाटा समुहाने गेल्या वर्षी एअर इंडियाची खरेदी केल्यानंतर त्यात अनेक नवे बदल केले जात आहेत.

    • Air India Maharaja : एअर इंडियाची ओळख असलेल्या महाराजाला टाटा ग्रुप कायमचा टाटा करण्याची शक्यता आहे. टाटा समुहाने गेल्या वर्षी एअर इंडियाची खरेदी केल्यानंतर त्यात अनेक नवे बदल केले जात आहेत.

Air India Maharaja : एअर इंडिया टाटा समुहाकडे गेल्यानंतर त्यात सतत नवनवीन बदल केले जात असल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. आता एअर इंडियासंदर्भात टाटा कंपनी महत्त्वपूर्ण बदल करत आहे. एअर इंडिया आपल्या मॅस्काॅट म्हणजेच शुभंकर महाराजाला टाटा म्हणण्याच्या तयारीत आहे. याचाच अर्थ, गेल्या अनेक दशकांपासून एअर इंडियाची ओळख असलेल्या 'महाराजा' ब्रँड आता यापुढे असणार नाही.गेल्या वर्षी टाटा समुहाने एअऱ इंडियावर मालकी हक्क घेतल्यानंतर रिब्रँडिंग आणि पूर्नगठीत प्रक्रियेवर काम सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

एअर इंडियाने महाराजा हटवण्याचा निर्णय का घेतला

बदलणाऱ्या काळासोबत महाराजा ब्रँड हा आऊटडेटेड झाल्याचे कंपनीला वाटते. एअर इंडियाला बिझनेस ट्रॅव्हलर्स आणि काॅर्पोरेट एक्झिक्युटिव्हसाठी प्रमुख एअर लाईन बनायचे आहे. त्यामुळे शुभंकर महाराजा गेल्या अनेक दशकांपासून यशस्वी होऊनही सध्याच्या ग्राहकांच्या ब्रँडिंगच्या दृष्टीने तो उपयुक्त नाही, असे कंपनीला वाटते.

गेल्या वर्षभरापासून एअर इंडियामध्ये होत असलेल्या बदलांपैकी हा एक भाग आहे. एअर इंडियाचे पुनर्ब्रँडिंग म्हणून उचलले जाणारे पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे. कंपनीला भारताबाहेरील प्रवाशांसाठी देखील पसंतीचे कॅरियर बनायचे आहे. कंपनीच्या प्रवाशांचा एक मोठा वर्ग हा व्यावसायिक आणि कॉर्पोरेट प्रवासी आहे आणि त्यांना एअर इंडियाची ओळख म्हणून 'महाराजा' बरोबर राहणे कठीण जाईल.

विभाग

पुढील बातम्या