मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Group Stock : शेअर आहे की अलिबाबाची गुहा! आठ दिवसांत पैसे जवळपास दुप्पट

Adani Group Stock : शेअर आहे की अलिबाबाची गुहा! आठ दिवसांत पैसे जवळपास दुप्पट

Dec 06, 2023, 04:54 PM IST

  • Adani Total gas share price news : अदानी समूहातील अदानी टोटल गॅस या शेअरनं अवघ्या ८ दिवसांत गुंतवणूकदरांचे पैसे जवळपास दुप्पट करून दिले आहेत.

Adani Total Gas

Adani Total gas share price news : अदानी समूहातील अदानी टोटल गॅस या शेअरनं अवघ्या ८ दिवसांत गुंतवणूकदरांचे पैसे जवळपास दुप्पट करून दिले आहेत.

  • Adani Total gas share price news : अदानी समूहातील अदानी टोटल गॅस या शेअरनं अवघ्या ८ दिवसांत गुंतवणूकदरांचे पैसे जवळपास दुप्पट करून दिले आहेत.

Adani Total gas share price news in marathi : हिंडनबर्ग अहवालाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं निरीक्षण, अमेरिका सरकारनंही अहवालाच्या सत्यतेबद्दल व्यक्त केलेली शंका आणि केंद्रातील मोदी सरकारनं विधानसभा निवडणुकांत मिळवलेलं यश…  अशा तिहेरी योगाचा जबरदस्त फायदा अदानी समूहाला झाला आहे. अदानी समूहाच्या प्रत्येक कंपनीची शेअर बाजारात घोडदौड सुरू असून अदानी टोटल गॅस या कंपनीनं गुंतवणूकदारांची चांदी करून दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार आहे. भाजपच्या निवडणुकीतील यशानंतर त्याला अधिक बळ मिळालं आहे. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. अदानी टोटल गॅस (ATGL) च्या शेअरनं अवघ्या ८ दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ दुप्पट केले आहेत. आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच आज हा शेअर तब्बल २० टक्क्यांनी वाढून १०५३.८० वर पोहोचला.

Dividend Stock : वेदांता ग्रुपच्या कंपनीनं जाहीर केला भरघोस लाभांश, एका शेअरमागे किती रुपये मिळणार? वाचा!

असा मिळाला छप्परफाड परतावा

अदानी टोटल गॅसच्या शेअरचा भाव २३ नोव्हेंबर रोजी ५३० रुपये होता. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत या शेअरनं १००० रुपयांचा टप्पा ओलांडला. म्हणजेच १०० टक्के परतावा दिला. ज्या गुंतवणूकदारानं २३ नोव्हेंबर रोजी या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांचे पैसे थेट दुप्पट झाले. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात अदानी टोटल गॅसच्या शेअरनं ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली होती. हा शेअर५२१.९५ रुपयांपर्यंत घसरला होता.

तेजीचं नेमकं कारण काय?

वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात हिंडनबर्ग अहवालामुळं अदानी समूहाच्या शेअर्सना मोठा फटका बसला होता. या धक्क्यातून हळूहळू अदानीच्या कंपन्या सावरून लागल्या असतानाच सर्वोच्च न्यायालयानं हिंडनबर्ग अहवालावर टिप्पणी केली. 'पुराव्याशिवाय अहवालावर विश्वास ठेवणं योग्य नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं. या टिप्पणीमुळं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या. न्यायालयाच्या टिप्पणीमुळं सेबीकडून वेगळा अहवाल येण्याची शक्यता कमी असल्याचं मानलं जात आहे. तीन राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा विजय हा २०२४ च्या लोकसभा विजयाचा संकेत मानला जात आहे. तसं झाल्यास स्थिर सरकार येण्याच्या शक्यतेमुळं एकूण बाजारातच उत्साह आहे. त्याचा थेट फायदा अदानी समूहाच्या शेअर्सना झाला आहे.

पुढील बातम्या