मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Group : इस्राइल युद्धाचा अदानीच्या 'या' शेअरला मोठा फटका; काय आहे कारण?

Adani Group : इस्राइल युद्धाचा अदानीच्या 'या' शेअरला मोठा फटका; काय आहे कारण?

Oct 09, 2023, 05:38 PM IST

  • adani ports share price : इस्राइल व हमासमध्ये पेटलेल्या युद्धाचा सर्वात मोठा फटका अदानी समूहाच्या एका कंपनीला बसला आहे. काय आहे यामागचं कारण?

Adani Group

adani ports share price : इस्राइल व हमासमध्ये पेटलेल्या युद्धाचा सर्वात मोठा फटका अदानी समूहाच्या एका कंपनीला बसला आहे. काय आहे यामागचं कारण?

  • adani ports share price : इस्राइल व हमासमध्ये पेटलेल्या युद्धाचा सर्वात मोठा फटका अदानी समूहाच्या एका कंपनीला बसला आहे. काय आहे यामागचं कारण?

adani ports share price : हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल व पॅलेस्टिनमध्ये भडकलेल्या भयंकर युद्धाचे पडसाद जगभरात उमटू लागले आहेत. भारतीय शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसत असून सेन्सेक्स जवळपास ५०० अंकांनी घसरला आहे. हिंडनबर्ग आणि ओसीसीआरपीच्या आरोपांतून सावरलेल्या अदानी समूहाला देखील ताज्या घडामोडींचा फटका बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

बाजारातील अस्थितरमुळं अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे शेअर ५ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कंपनीचा शेअर आज ७८८.५० रुपयांपर्यंत घसरला. शेअरच्या या घसरणीमागे जागतिक पातळीवरील तणावपूर्ण परिस्थिती कारणीभूत असल्याचं बोललं जातं आहे. इस्राइल आणि हमासमध्ये सुरू झालेल्या संघर्षानंतर भारतही अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. भारत सरकारनं इस्राइलमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक अ‍ॅडव्हायजरी प्रसिद्ध केली आहे.

अदानी पोर्ट्सला सर्वात मोठा फटका का?

गौतम अदानी समूहानं अलीकडं इस्राइलचं हैफा बंदर ताब्यात घेतलं आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) आणि इस्राइलच्या गॅडोट ग्रुपनं मागील वर्षी जुलैमध्ये इस्राइलमधील हैफा बंदराच्या खासगीकरणाच्या प्रकल्पासाठी झालेला लिलाव १.१८ अब्ज डॉलरची बोली लावून जिंकला होता. या प्रकल्पात अदानी समूहाची ७० टक्के आणि गडॉट ग्रुपची ३० टक्के हिस्सेदारी आहे. हैफा बंदर हे शिपिंग कंटेनरच्‍या बाबतीत इस्राइलचं दुसरं सर्वात मोठं बंदर आहे आणि टूरिस्ट क्रूझ जहाजांच्या बाबतीत सर्वात मोठं बंदर आहे.

अदानी समूहाची तात्काळ प्रतिक्रिया

ताज्या घडामोडींवर अदानी पोर्ट्सनं तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. 'इस्राइलच्या नागरिकांविषयी आम्हाला सहानुभूती आहे. हैफा बंदरावर आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. आमच्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी आम्ही आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत आणि ते सर्व सुरक्षित आहेत, असं कंपनीनं म्हटलं आहे.

भारतीय व्यवसायावर होऊ शकतो परिणाम?

पीटीआयच्या वृत्तानुसार, इस्राइला-हमास संघर्षामुळं भारतीय व्यावसायिकांची अडचण होण्याची शक्यता आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय निर्यातदारांना विम्यापोटी अतिरिक्त प्रीमियम आणि शिपिंग खर्चाचा भुर्दंड बसू शकतो. भारतीय दूतावासाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, इस्राइलमध्ये सुमारे १८ हजार भारतीय नागरिक आहेत. त्यात विशेषत: वृद्ध, हिरे व्यापारी, आयटी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या लोकांचा समावेश आहे.

विभाग

पुढील बातम्या