मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Ports : अदानी समूहाने खरेदी केले आणखी एक बंदर, आठ राज्यांना होणार फायदा

Adani Ports : अदानी समूहाने खरेदी केले आणखी एक बंदर, आठ राज्यांना होणार फायदा

Oct 11, 2022, 03:54 PM IST

  • Adani आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (Sez) ही देशातील सर्वात मोठी बंदर कंपनी आहे. गंगावरम बंदरात यापूर्वीच 40 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. आता कंपनीने उर्वरित 58.1 टक्के भागभांडवलही विकत घेतले आहे.या करारासाठी कंपनीला NCLT अहमदाबाद आणि NCLT हैदराबादकडून परवानगी मिळाली आहे. 

Gangavaram Ports HT

Adani आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (Sez) ही देशातील सर्वात मोठी बंदर कंपनी आहे. गंगावरम बंदरात यापूर्वीच 40 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. आता कंपनीने उर्वरित 58.1 टक्के भागभांडवलही विकत घेतले आहे.या करारासाठी कंपनीला NCLT अहमदाबाद आणि NCLT हैदराबादकडून परवानगी मिळाली आहे.

  • Adani आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (Sez) ही देशातील सर्वात मोठी बंदर कंपनी आहे. गंगावरम बंदरात यापूर्वीच 40 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. आता कंपनीने उर्वरित 58.1 टक्के भागभांडवलही विकत घेतले आहे.या करारासाठी कंपनीला NCLT अहमदाबाद आणि NCLT हैदराबादकडून परवानगी मिळाली आहे. 

Adani Ports :  अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (Sez) ही देशातील सर्वात मोठी बंदर कंपनी आहे. गंगावरम बंदरात यापूर्वीच 40 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. आता कंपनीने उर्वरित 58.1 टक्के भागभांडवलही विकत घेतले आहे.या करारासाठी कंपनीला NCLT अहमदाबाद आणि NCLT हैदराबादकडून परवानगी मिळाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी सध्या आपला व्यवसाय झपाट्याने विस्तारत आहेत. या क्रमाने त्यांनी आणखी एका बंदराचे नाव त्यांच्या नावावर केले आहे. गंगावरम पोर्ट लि. गौतम अदानी यांचा संपूर्णपणे मालकी हक्क राहणार आहे. अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने गंगावरम बंदरातील संपूर्ण हिस्सा विकत घेतला आहे. गंगावरम हे आंध्र प्रदेशातील तिसरे मोठे बिगर प्रमुख बंदर आहे.

कंपनीकडे आधीच ४० टक्के भागभांडवल

या करारासाठी कंपनीला NCLT अहमदाबाद आणि NCLT हैदराबादकडून परवानगी मिळाली आहे. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन ही देशातील सर्वात मोठी बंदर कंपनी आहे. गंगावरम बंदरात यापूर्वीच 40 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. आता कंपनीने उर्वरित 58.1 टक्के हिस्साही विकत घेतला आहे. यानंतर कंपनीच्या पोर्टफोलिओमधील बंदरांची संख्या आता 12 झाली आहे.

खोल पाण्याचे बंदर

गंगावरम पोर्टच्या अधिग्रहणामध्ये रु. 120 प्रति शेअर दराने 6,200 कोटी रुपयांचे 517 दशलक्ष शेअर्स आहेत. अदानी पोर्ट्स डीव्हीएस राजू आणि कुटुंबाकडून शेअर स्वॅप व्यवस्थेद्वारे 58.1 टक्के स्टेक घेणार आहे. गंगावरम बंदर हे खोल पाण्याचे बहुउद्देशीय बंदर आहे. हे 200,000 DWT पर्यंत पूर्ण लोड केलेल्या सुपर कॅप आकाराच्या जहाजांना हाताळण्यास सक्षम आहे. सध्या बंदरात 9 धक्के कार्यरत आहेत.

रेल्वे आणि रस्ते नेटवर्कशी संलग्न

एका नियामक फाइलिंगमध्ये अदानी पोर्ट्सचे सीईओ आणि संचालक करण अदानी म्हणाले की, गंगावरम बंदराचे अधिग्रहण भारतातील सर्वात मोठी वाहतूक उपयुक्तता म्हणून आमचे स्थान मजबूत करेल. गंगावरम बंदर उत्कृष्ट रेल्वे आणि रस्ते नेटवर्कशी संलग्न आहे. त्यामुळे या बंदराशी संलग्न असलेल्या आठ राज्यांमध्ये वाहतूक करणे अधिक सोईचे होणार आहे.

हैफा बंदर ताब्यात घेतले

जुलै महिन्यात अदानी समूहाने इस्रायलमधील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेले हैफा बंदर ताब्यात घेतले. हे बंदर 1.18 अब्ज अमेरिकन डाॅलर्सना विकत घेतले होते. हैफा बंदर हे इस्रायलचे दुसरे मोठे बंदर आहे.

पुढील बातम्या