मराठी बातम्या  /  बिझनेस  /  adani group : अदानी समूहाच्या चौकशी प्रकरणाची सुनावणी तूर्त टळली, पण…

adani group : अदानी समूहाच्या चौकशी प्रकरणाची सुनावणी तूर्त टळली, पण…

Aug 29, 2023, 01:57 PM IST

  • SC on Adani Hindenburg Hearing : अदानी-हिंडनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे.

Supreme Court on Adani Group

SC on Adani Hindenburg Hearing : अदानी-हिंडनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे.

  • SC on Adani Hindenburg Hearing : अदानी-हिंडनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे.

SC on Adani Hindenburg row Hearing : हिंडनबर्ग संस्थेनं अदानी समूहावर केलेल्या आरोपांच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुढं ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल सेक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) न्यायालयात दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी अपेक्षित होती. आज ती होऊ शकली नाही. मात्र, अदानी समूहानं काही नियमांचं उल्लंघन केल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्यानं अदानीला दंडाचा दणका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अदानी समूहानं आपल्या शेअरच्या भावात कृत्रिम चढउतार करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा ठपका हिंडनबर्ग या संशोधन संस्थेनं ठेवला होता. त्याशिवाय अदानी समूहावर अन्य काही आरोप केले होते. त्यानंतर भारतीय उद्योग जगतात खळबळ उडाली होती. अदानी समूहानं हे आरोप फेटाळले होते. मात्र, केंद्र सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप करत विरोधकांनी चौकशीची मागणी केली होती. काही लोकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

Vivo V29e sale : ३२ हजारांचा विवो व्ही २९ अर्ध्या किंमतीत मिळणार; 'इथं' आहे मेगासेल

सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सेबीला चौकशीचे आदेश दिले होते. तसंच चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. सेबीनं आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती. मात्र, न्यायालयानं नकार दिल्यानंतर सेबीनं २५ ऑगस्ट रोजी चौकशी अहवाल सादर केला.

सेबीच्या चौकशी अहवालात नेमकं काय आहे हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. तथापि, या अहवालात अदानी समूहावर झालेल्या २४ वेगवेगळ्या आरोपांच्या चौकशीचा उहापोह असल्याचं समजतं. कलम ३७० वर सुनावणी सुरू असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं ही सुनावणी पुढं ढकलली असल्याचं समजतं.

अदानी समूहाकडून नियमांचं उल्लंघन?

'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं या संदर्भात मोठा दावा केला आहे. सेबीच्या अहवालात अदानी समूहाच्या काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अदानी समूहानं काही नियमांचं उल्लंघन केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळं अदानी समूहाला दंड ठोठावला जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील बातम्या