मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sebi Adani : अदानी समूहावरील आरोपांच्या चौकशीचं काय होणार?; सेबीची चौकशी संपेचना!

Sebi Adani : अदानी समूहावरील आरोपांच्या चौकशीचं काय होणार?; सेबीची चौकशी संपेचना!

Aug 14, 2023, 07:59 PM IST

  • Sebi on Adani Hindenburg Enquiry : सेबी अमेरिकन शाॅर्ट सेलर कंपनी हिडेनबर्गच्या आरोपांची चौकशी करत आहे. अदानी समूहावर लावण्यात आलेल्या आरोपांचा तपास अहवाल १४ ऑगस्ट म्हणजे आज सादर करणे अपेक्षित होते. मात्र सेबीने पुन्हा एकदा मुदत वाढ मागितली आहे.

adani HT

Sebi on Adani Hindenburg Enquiry : सेबी अमेरिकन शाॅर्ट सेलर कंपनी हिडेनबर्गच्या आरोपांची चौकशी करत आहे. अदानी समूहावर लावण्यात आलेल्या आरोपांचा तपास अहवाल १४ ऑगस्ट म्हणजे आज सादर करणे अपेक्षित होते. मात्र सेबीने पुन्हा एकदा मुदत वाढ मागितली आहे.

  • Sebi on Adani Hindenburg Enquiry : सेबी अमेरिकन शाॅर्ट सेलर कंपनी हिडेनबर्गच्या आरोपांची चौकशी करत आहे. अदानी समूहावर लावण्यात आलेल्या आरोपांचा तपास अहवाल १४ ऑगस्ट म्हणजे आज सादर करणे अपेक्षित होते. मात्र सेबीने पुन्हा एकदा मुदत वाढ मागितली आहे.

Adani Hindenburg Update : बाजार नियमाक सेबीने हिडेनबर्ग प्रकरणी आपली चौकशी पूर्ण करण्यासाठी आणि रिपोर्ट सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसांची अतिरिक्त मुदत मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर सेबी अमेरिकेच्या शाॅर्ट सेलर फर्म हिडेनबर्गच्या आरोपांची चौकशी करत आहेत. अदानी समूहावर लावण्यात आलेल्या आरोपांचा चौकशी अहवाल आज १४ आॅगस्टला सादर करायचा होता. मात्र सेबीने आता पुन्हा एकदा अतिरिक्त कालावधी मागितला आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने सेबीची मागणी मान्य केल्यास रिपोर्ट सादर करण्यासही दिरंगाई होईल.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

मार्चमध्ये न्यायालयाने दिला आदेश

गेल्या २ मार्च सर्वोच्च न्यायालयाने सेबीला निर्देश दिले होते की, अदानी ग्रुपवर हिडेनबर्ग रिपोर्टवर पहिल्यांदा आणि त्यानंतरच्या नियम उल्लंघनासंदर्भात चौकशी करावी. यासाठी सेबीला २ महिन्यांचा कालावधी दिला आहे. ही डेडलाईन २ मे ला संपणार होती. याआधी २९ एप्रिलला सेबीने सर्वोच्च न्यायालयाला चौकशीसाठी अतिरिक्त ६ महिन्यांची मुदत मागितली होती. दरम्यान न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आणि १४ आॅगस्टला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा सेबीने १५ दिवसांची मुदत मागितली आहे.

अमेरिकन फर्म हिंडनबर्गने जानेवारी २०२३ मध्ये एक अहवाल सादर केला होता. या रिपोर्टमध्ये अदानी समूहावर शेअर्स हेराफेरीचा आरोप लावण्यात आला होता. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. या घटनाक्रमानंतर गौतम अदानी टाॅप २० अब्जाधीशांच्या यादीतून मागे आले. अदानी समूहाला गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.

पुढील बातम्या