मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Airports: अदानी समूहाच्या मुंबईतील दोन विमानतळांच्या खात्यांची चौकशी सुरू

Adani Airports: अदानी समूहाच्या मुंबईतील दोन विमानतळांच्या खात्यांची चौकशी सुरू

Oct 14, 2023, 03:44 PM IST

    • Adani Groups Mumbai Airports Investigation: कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने उद्योजक गौतम अदानी समूहाच्या मुंबईतील दोन विमानतळांच्या खात्यांची चौकशी सुरु केली.
Gautam Adani (REUTERS)

Adani Groups Mumbai Airports Investigation: कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने उद्योजक गौतम अदानी समूहाच्या मुंबईतील दोन विमानतळांच्या खात्यांची चौकशी सुरु केली.

    • Adani Groups Mumbai Airports Investigation: कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने उद्योजक गौतम अदानी समूहाच्या मुंबईतील दोन विमानतळांच्या खात्यांची चौकशी सुरु केली.

Adani Groups Mumbai Airports: कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने उद्योजक गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या मालकीच्या मुंबई येथील दोन विमानतळाच्या खात्यांची तपासणी सुरु केली आहे. अदांनी एंटरप्रायझेसने शुक्रवारी स्टॉक एक्स्चेंजला याबाबत माहिती दिली. यानंतर अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत टक्क्यांनी घसरली. अदानी एंटरप्रायझेसचा बीएसई २ हजार ४५४ रुपये ६५ पैसे यावर बंद झाली.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

वृत्तसंस्था रॉयटर्स दिलेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड नोटीस आज नोटीस पाठवली. तसेच अदानी समूहाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची आर्थिक वर्षे २०१७-१८ ते आर्थिक वर्ष २०१२- २२ पर्यंत माहिती आणि कागदपत्रे मागवली आहेत. या संदर्भात अदानी समूहाची कोणताही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. यापूर्वी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने फेब्रुवारी महिन्यात अदानी समूहाची चौकशी केली होती.

अदानी समूहाचे देशात एकूण सात विमानतळ आहे. बईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही समावेश आहे. अदानी समूहाने हे विमानतळ २०२१ मध्ये खरेदी केले होते. यापूर्वी २०१९ मध्ये सरकारच्या खासगीकरण मोहिमेदरम्यान अदानी समूहाला एकूण ६ विमानतळ मिळाली होती. याशिवाय, नवी मुंबईत नवीन विमानतळाचे बांधकाम सुरु आहे.

एमसीएच्या तपासामुळे अदानी समूहाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालात अदानी कंपनीवर ऑफशोअर टॅक्स हेव्हन्सचा बेकायदेशीर वापर आणि संभाव्य स्टॉक मॅनिपुलेशनचा आरोप केला होता. त्यावेळी अदानी समूहाने हे सर्व आरोपी फेटाळून लावले. मात्र, त्याचा फटका कंपनीच्या शेअर्सना बसला.

विभाग

पुढील बातम्या