मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Group : अदानी समूह पुन्हा संकटात; शेअर गडगडले, गुंतवणूकदारांमध्ये घबराट

Adani Group : अदानी समूह पुन्हा संकटात; शेअर गडगडले, गुंतवणूकदारांमध्ये घबराट

Aug 31, 2023, 11:29 AM IST

  • Adani group stocks crash : ओसीसीआरपी या संस्थेनं केलेल्या आरोपांनंतर अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर गडगडले आहेत.

Gautam Adani (REUTERS)

Adani group stocks crash : ओसीसीआरपी या संस्थेनं केलेल्या आरोपांनंतर अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर गडगडले आहेत.

  • Adani group stocks crash : ओसीसीआरपी या संस्थेनं केलेल्या आरोपांनंतर अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर गडगडले आहेत.

Adani group stocks crash : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) या संस्थेनं अदानी समूहावर काही आरोप केले आहेत. त्याचा थेट परिणाम समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर झाला आहे. अदानीच्या कंपन्यांचे शेअर गडगडले असून गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अदानी एन्टरप्रायझेस, अदानी पोर्ट, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ग्रीन सोल्युशन्स आणि अदानी विल्मार या कंपन्यांचे शेअर आज सकाळच्या सत्रात ४ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

PhonePe : फोन पे ने लाँन्च केले शेअर मार्केट ॲप; आयपीओही येणार; कसा होणार फायदा ?

काय आहे आरोप?

ओसीसीआरपीनं प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, अदानी समूहानं आपलेच शेअर गुपचूप खरेदी करून स्टॉक एक्स्चेंजमध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. समूहाच्या प्रवर्तकाच्या कुटुंबाच्या पार्टनरनंच मॉरिशसस्थित बेनामी गुंतवणूक फंडाद्वारे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. OCCRP या संस्थेला अब्जाधीश जॉर्ज सोरोस आणि रॉकफेलर ब्रदर्स फंड सारख्या संस्थांकडून अर्थपुरवठा केला जातो. जॉर्ज सोरोस हे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे टीकाकार आहेत.

अदानीच्या कोणत्या शेअरमध्ये किती घसरण?

अदानी एन्टरप्रायझेस : सकाळच्या सत्रात ४.३ टक्क्यांनी घसरून ३४०३.६० वर आला.

अदानी पोर्ट - अदानी पोर्टचे शेअर्स २.८१ घसरून ७९५.९५ रुपयांवर

अदानी पॉवर - अदानी पॉवरचा शेअर ४.५८ टक्क्यांनी घसरून ३१३.३५ रुपयांवर

अदानी ग्रीन एनर्जी - ४.३५ घसरून ८०५.०५ रुपयांवर

अदानी ग्रीन सोल्युशन्स - अदानी ग्रीन सोल्युशन्सचे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरून ६२६.४० रुपयांवर

अदानी विल्मर - अदानी विल्मरचा शेअर १.७५ टक्क्यांनी घसरून ३६२.५० रुपयांवर

पुढील बातम्या