मराठी बातम्या  /  बिझनेस  /  OCCRP Report : हा तर हिंडनबर्गचं भूत पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न; अदानी समूहाची तिखट प्रतिक्रिया

OCCRP Report : हा तर हिंडनबर्गचं भूत पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न; अदानी समूहाची तिखट प्रतिक्रिया

Aug 31, 2023, 11:44 AM IST

  • Adani Group on occrp report : ओसीसीआरपी समूहानं केलेले आरोप अदानी समूहानं स्पष्ट शब्दांत फेटाळले आहेत. काय म्हणतो अदानी समूह?

Adani Group on OCCRP Report (REUTERS)

Adani Group on occrp report : ओसीसीआरपी समूहानं केलेले आरोप अदानी समूहानं स्पष्ट शब्दांत फेटाळले आहेत. काय म्हणतो अदानी समूह?

  • Adani Group on occrp report : ओसीसीआरपी समूहानं केलेले आरोप अदानी समूहानं स्पष्ट शब्दांत फेटाळले आहेत. काय म्हणतो अदानी समूह?

adani group rejects occrp report : अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याकडून अर्थपुरवठा होणाऱ्या ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCRP) संस्थेनं केलेले सर्व आरोप अदानी समूहानं स्पष्ट शब्दांत फेटाळले आहेत. हिंडनबर्गचं भूत पुन्हा जिवंत करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची तिखट प्रतिक्रिया अदानी समूहानं दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अदानी समूहानं आपलेच शेअर गुपचूप खरेदी करून शेअर मार्केटमध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. एका प्रवर्तकाच्या कुटुंबाच्या पार्टनरनंच मॉरिशसस्थित बेनामी गुंतवणूक फंडाद्वारे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केल्याचा आरोप OCCRP च्या अहवालात करण्यात आला आहे.

Adani Group : अदानी समूह पुन्हा संकटात; शेअर गडगडले, गुंतवणूकदारांमध्ये घबराट

अदानी समूहानं हे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. हिंडेनबर्गचं भूत पुन्हा जिवंत करून आमच्या समूहाची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. सोरोस यांच्या इशाऱ्यावर व आर्थिक मदतीवर चालणाऱ्या विदेशी मीडियाचा हा डाव आहे, असं अदानी समूहानं म्हटलं आहे.

अदानी समूह म्हणतो…

'आम्ही हा अहवाल स्पष्टपणे नाकारतो. असा अहवाल येणं आणि हे आरोप होणं हे स्वाभाविक आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी निकाली निघालेली काही प्रकरणं पुन्हा उकरून हे आरोप करण्यात आले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयानं (डीआरआय) नं या संदर्भात यापूर्वीही सखोल आणि सर्व बाजूंनी चौकशी केली आहे. त्यामुळं आता या आरोपांना कोणताही आधार नाही, असं अदानी समूहानं म्हटलं आहे.

सुमारे आठ महिन्यांपूर्वी हिंडनबर्ग रिसर्च संस्थेनं अदानी समूहावर शेअरच्या भावांमध्ये कृत्रिम चढउतार आणून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर आठ महिन्यांनी ओसीसीआरपीचा हा अहवाल आला आहे.

विभाग

पुढील बातम्या