मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Group Share: अदानी समूहाच्या 'या' कंपन्यांनी केलं गुंतवणूकदारांना मालामाल, तुमच्याकडं आहेत का?

Adani Group Share: अदानी समूहाच्या 'या' कंपन्यांनी केलं गुंतवणूकदारांना मालामाल, तुमच्याकडं आहेत का?

Oct 22, 2022, 04:46 PM IST

    • Adani Group Shares: मागच्या वर्षभरात अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला आहे.
Gautam Adani

Adani Group Shares: मागच्या वर्षभरात अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला आहे.

    • Adani Group Shares: मागच्या वर्षभरात अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला आहे.

Adani Group Share: गेल्या काही वर्षांपासून अदानी समूहाच्या कंपन्यांचा भारतातच नव्हे, तर जगभरात डंका वाजत आहे. याच कंपन्यांच्या यशाच्या जोरावर गौतम अदानी हे जगातील श्रीमंतांना टक्कर देत आहेत. भारतीय शेअर बाजारातही त्याचं प्रतिबिंब उमटलं असून अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना अक्षरश: मालामाल केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

गेल्या वर्षी दिवाळीत अदानी समूहाच्या सहा कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी झाली होती. यापैकी तीन कंपन्यांच्या शेअर्सनं यंदाच्या दिवाळीपर्यंत बंपर परतावा दिला आहे. अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांचा यात समावेश आहे. त्यातही अदानी पॉवरच्या शेअर्सनी तिप्पट परतावा देत सर्वात सरस कामगिरी केली आहे. त्यानंतर अदानी टोटल गॅस आणि अदानी एंटरप्रायझेसचा क्रमांक लागतो.

अदानी समूहातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या अदानी पोर्ट्सनंही गुंतवणूकदारांना जवळपास १३ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. अदानी ग्रीन आणि अदानी ट्रान्समिशन या अन्य दोन शेअर्सनी अनुक्रमे ७६.७२ टक्के आणि ७१.८८ टक्के इतका परतावा दिला आहे. अदानी विल्मरचे शेअर्स याच वर्षी बाजारात सूचीबद्ध झाले होते.

बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी

अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाने एसीसी आणि अंबुजा सिमेंट्स या दोन शेअर लिस्टेड कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. अदानी पोर्ट्सचा अभ्यास करणार्‍या २२ विश्लेषकांपैकी एकानंही अद्याप विक्रीचे संकेत दिलेले नाहीत. ट्रेंडलाइनच्या अहवालानुसार, सर्वच विश्लेषकांनी अदानी पोर्ट्ससाठी ९१३ रुपयांपर्यंतचे सरासरी टार्गेट ठेवलं आहे. म्हणजेच, १३ टक्के परताव्याची आशा आहे. अदानी टोटल गॅसच्या शेअर धारकांनी चांगल्या परताव्यासाठी हा शेअर दीर्घ काळ पोर्टफोलिओमध्ये ठेवावा, असा सल्ला ब्रोकरेज फर्म व्हेंचुरा सिक्युरिटीजनं अलीकडंच दिला आहे.

 

(टीप: संबंधित वृत्त हे कंपन्यांच्या शेअर बाजारातील कामगिरीवर आधारीत आहे. हा कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा निर्णय तज्ज्ञांशी सल्लामसलत करून घ्यावा.)

पुढील बातम्या