मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Group: अदानी समूहाची टेलिकाॅम क्षेत्रात उडी; एअरटेल व जिओपुढं मोठं आव्हान

Adani Group: अदानी समूहाची टेलिकाॅम क्षेत्रात उडी; एअरटेल व जिओपुढं मोठं आव्हान

Oct 12, 2022, 03:30 PM IST

  • Adani Data Network Ltd : अदानी समूहाने लिलावात स्पेक्ट्रम खरेदी करून देशातील दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. टेलिकाॅम क्षेत्रातील अदानी समुहाच्या नव्या प्रवेशाने व्होडा-आयडिया, एअरटेल आणि जिओ कंपन्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

Gautam Adani HT

Adani Data Network Ltd : अदानी समूहाने लिलावात स्पेक्ट्रम खरेदी करून देशातील दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. टेलिकाॅम क्षेत्रातील अदानी समुहाच्या नव्या प्रवेशाने व्होडा-आयडिया, एअरटेल आणि जिओ कंपन्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

  • Adani Data Network Ltd : अदानी समूहाने लिलावात स्पेक्ट्रम खरेदी करून देशातील दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. टेलिकाॅम क्षेत्रातील अदानी समुहाच्या नव्या प्रवेशाने व्होडा-आयडिया, एअरटेल आणि जिओ कंपन्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

Adani Data Network Ltd : अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड (ADNL) ला प्रवेशयोग्यता सेवांसाठी युनिफाइड परवाना देण्यात आला आहे. या परवान्याद्वारे कंपनी देशात सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा देऊ शकते. अदानीच्या प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया व्यतिरिक्त जिओ, एअरटेल यांसारख्या कंपन्यांसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाच्या कंपनी एडीएनएलला इंटिग्रेटेड लायसन्स परवाना मंजूर झाल्याची माहिती मिळाली आहे. याचाच अर्थ, आता ते लांब पल्ल्याच्या कॉल्ससाठी आणि इंटरनेट सेवा प्रदान करण्यास पात्र आहेत. हा परवाना मिळाल्यानंतर, कंपनी भविष्यात तिच्या 5G सेवांचा विस्तार करू शकते. अदानीच्या प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया व्यतिरिक्त जिओ, एअरटेल यांसारख्या कंपन्यांसमोर नवीन आव्हान असेल.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अदानी डेटा नेटवर्क्सला यूएृल (एएस) परवाना मिळाला आहे." सोमवारी परवाना जारी करण्यात आला आहे. मात्र, या संदर्भात अदानी समूहाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

अदानी समूहाने सोमवारी झालेल्या लिलावात स्पेक्ट्रम खरेदी करून देशातील दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. या स्पेक्ट्रमचा वापर समूहातील व्यावसायिक उपक्रमांसाठी करणार असल्याचे कंपनीने सांगितले. एडीएनएलने नुकत्याच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात 400 MHz स्पेक्ट्रम 20 वर्षांसाठी 212 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

पुढील बातम्या