मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani China connection: अदानीच्या ‘चीन कनेक्शन’बाबत वादग्रस्त उद्योगपतीनेच केला खुलासा…

Adani China connection: अदानीच्या ‘चीन कनेक्शन’बाबत वादग्रस्त उद्योगपतीनेच केला खुलासा…

Apr 14, 2023, 08:13 PM IST

  • Adani Chine Connection: अदानी समूहातर्फे चीनमध्ये बंदरे, टर्मिनल्स, रेल्वे लाईन, पॉवर लाईन्स आणि इतर पायाभूत सुविधांचे बांधकाम करण्यात येते. अदानी समूहातर्फे ही कामे पीएमसी प्रोजेक्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडतर्फे करण्यात येत असून मॉरिस चांग हे या कंपनीमध्ये संचालक आहेत.

Adani-China row: Morris Chang says, 'I am a Taiwanese citizen'

Adani Chine Connection: अदानी समूहातर्फे चीनमध्ये बंदरे, टर्मिनल्स, रेल्वे लाईन, पॉवर लाईन्स आणि इतर पायाभूत सुविधांचे बांधकाम करण्यात येते. अदानी समूहातर्फे ही कामे पीएमसी प्रोजेक्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडतर्फे करण्यात येत असून मॉरिस चांग हे या कंपनीमध्ये संचालक आहेत.

  • Adani Chine Connection: अदानी समूहातर्फे चीनमध्ये बंदरे, टर्मिनल्स, रेल्वे लाईन, पॉवर लाईन्स आणि इतर पायाभूत सुविधांचे बांधकाम करण्यात येते. अदानी समूहातर्फे ही कामे पीएमसी प्रोजेक्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडतर्फे करण्यात येत असून मॉरिस चांग हे या कंपनीमध्ये संचालक आहेत.

अदानी समूहाचे एका चिनी उद्योगपतीशी संबंध असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. अदानींचे चीनसोबत संबंध असल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी संयुक्त संसदीय समितीमार्फत या प्रकरमाची चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली होती. परंतु कॉंग्रेसने ज्या चिनी उद्योगपतीचा उल्लेख केला होता, त्याने खुद्द स्वतःच्या नागरिकत्वाबाबत खुलासा जाहीर केला आहे. मी चीनचा नव्हे तर तैवानचा नागरिक असल्याचं मॉरिस चांग या उद्योगपतीने खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अदानी समूहातर्फे चीनमध्ये बंदरे, टर्मिनल्स, रेल्वे लाईन, पॉवर लाईन्स आणि इतर पायाभूत सुविधांचे बांधकाम करण्यात येते. अदानी समूहातर्फे ही कामे पीएमसी प्रोजेक्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडतर्फे करण्यात येत असून मॉरिस चांग हे या कंपनीमध्ये संचालक आहेत. अदानी समूहासोबत मिळून पीएमसी कंपनी उभारत असलेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलण्यास चांग यांनी मात्र नकार दिला.

चांग म्हणाले, ‘मी तैवानचा नागरिक आहे. प्रजासत्ताक चीनचा नागरिक असल्याचं माझ्या पासपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. तैवान हा देश प्रजासत्ताक चीन म्हणून अधिकृतपणे ओळखला जातो. तर चीन हा देश पीपल्स रिपब्लिक ऑफ चीन या नावाने ओळखला जातो, असे चांग यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, अदानींचे चिनी नागरिकाशी संबंध जाहीर असताना केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा दुर्लक्षित करून त्यांना देशातील महत्वाची बंदरं हाताळण्यासाठी का दिली, असा सवाल कॉंग्रेसने केला होता.

पीएमसीवर अदानी समूहाच्या कंपन्यांसाठी आयात केलेली उपकरणे ओव्हर इनव्हॉइस केल्याचाही आरोप आहे.

'मी तैवानमधला एक प्रस्थापित उद्योगपती आहे. जगभरात व्यापार, बंदर उद्योग, पायाभूत सुविधा, जहाज तोडणी इत्यादी व्यवसायात कार्यरत आहे’ असं चांग म्हणाले. अदानी समूहाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर कोणतेही भाष्य करण्यास मात्र नकार दिला.

दरम्यान, माझा राजकारणाशी काहीही संबंध नसून माझे नागरिकत्व तुम्हाला आधीच स्पष्ट केले आहे. माझ्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्याचा राजकीय मुद्दा बनवणे हे दुर्दैवी असल्याचं चांग म्हणाले.

पुढील बातम्या