मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Voter Id linked Aadhar : निवडणूक ओळखपत्र Aadhar लिंक करण्याची अंतिम मुदत वाढली,अशी करा प्रोसेस पूर्ण

Voter Id linked Aadhar : निवडणूक ओळखपत्र Aadhar लिंक करण्याची अंतिम मुदत वाढली,अशी करा प्रोसेस पूर्ण

Mar 22, 2023, 05:22 PM IST

  • Voter Id linked Aadhar : केंद्राने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवली आहे.

Voter Id linked Aadhar HT

Voter Id linked Aadhar : केंद्राने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवली आहे.

  • Voter Id linked Aadhar : केंद्राने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवली आहे.

Voter Id linked Aadhar : केंद्राने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवली आहे. मात्र, दोघांना संलग्न करणे बंधनकारक नाही. वापरकर्ते त्यांचे आधार मतदार कार्डशी ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे लिंक करू शकतात. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, आधार-पॅन लिंकिंगमुळे वेगवेगळ्या मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची वेगवेगळी नोंदणी ओळखण्यात मदत होईल.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

ऑनलाइन लिंकिंग प्रक्रिया

- सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP)- nvsp.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

- मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या "मतदार यादीत शोधा" वर क्लिक करा.

- आधार क्रमांक, राज्य, जिल्हा यासह वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि शोध बटणावर क्लिक करा.

- आधार तपशील प्रविष्ट केल्यानंतर, वापरकर्त्यांच्या मोबाइल नंबर किंवा ईमेलवर एक ओटीपी येईल.

- आता ओटीपी टाका. पूर्ण झाल्यावर तुमचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केले जाईल.

एसएमएस आणि फोनद्वारे कसे लिंक करावे

- १६६ किंवा ५१९६९ वर स्पेससह आधार क्रमांकासह मतदार आयडी एसएमएस करा.

- आता आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

- पर्याय विचारेल तशी माहिती देत ​​राहा आणि पुढे जा.

- अशा प्रकारे, तुम्ही एसएमएसद्वारेही आधारशी मतदार ओळखपत्र लिंक करू शकाल.

याशिवाय तुम्ही हेल्पलाइन क्रमांक १९५० वर कॉल करून तुमचा आधार मतदार ओळखपत्राशी लिंक करू शकतात

बनावट मतदारांना लगाम

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, यामुळे बनावट मतदार ओळखण्यास मदत होईल. आधार क्रमांक न दिल्यास कोणाचेही नाव मतदार यादीतून काढले जाणार नाही, तसेच नावनोंदणी करण्यापासून रोखले जाणार नाही.

३१ मार्च २०२३ पर्यंत पॅनला आधारशी लिंक करा

तुम्ही अजून तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल, तर ३१ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करा. अन्यथा तुमचे पॅन निष्क्रिय होईल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ३० जून २०२२ नंतर आधारशी पॅन लिंक करण्यासाठी १००० रुपये विलंब शुल्क आकारत आहे.

विभाग

पुढील बातम्या