मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून मोदींनी केली नव्या योजनेची घोषणा; हजारो कोटींची तरतूद

PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून मोदींनी केली नव्या योजनेची घोषणा; हजारो कोटींची तरतूद

Aug 15, 2023, 09:31 AM IST

  • PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ओबीसी समाजाला मदत करण्यासाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली. त्यासाठी अंदाजे १३००० ते १५००० कोटींची तरतूद करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

PM Modi HT

PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ओबीसी समाजाला मदत करण्यासाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली. त्यासाठी अंदाजे १३००० ते १५००० कोटींची तरतूद करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

  • PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ओबीसी समाजाला मदत करण्यासाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली. त्यासाठी अंदाजे १३००० ते १५००० कोटींची तरतूद करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ओबीसी समाजाला मदत करण्यासाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली. त्यासाठी अंदाजे १३००० ते १५००० कोटींची तरतूद करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

या विश्वकर्मा योजनेचा फायदा न्हावी, चर्मकार आणि लोहार यांच्यासह समाजातील कामगार वर्गाला मदत होणार आहे. ही योजना पुढील महिन्यात विश्वकर्मा जयंतीला सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या १० वर्षात केलेल्या कार्याचाही पाढा वाचला. मोदी म्हणाले की, देशातील गरीब सशक्त झाल्यास अर्थव्यवस्थेला बळकटी येते. गेल्या १० वर्षात देशातील साडे १० कोटी लोकांना गरीबीतून हटवण्यास यश मिळाले आहे.

जागतिक पातळीवर आज भारतीय अर्थव्यवस्था ५ क्रमांकावर पोहोचली आहे.२०४७ हे भारताचे लक्ष्य आहे. देशाच्या सर्वांगीण विकासावर मोदी सरकाने कायमच लक्ष्य ठेवले आहे. आज देश आधुनिकेच्या दृष्टीने पुढे चालला आहे. आज भारताने सर्वच क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने पाऊल ठेवले आहे. त्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत.

विश्वकर्मा योजनेबद्दल…

विश्वकर्मा योजना ही सध्या उत्तर प्रदेशमध्ये चालवली जाते. या योजनेंतर्गत कारागीरांना ६ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण नि:शुल्क असते. या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च उत्तर प्रदेश सरकारतर्फे उचलला जातो.

या योजनेत सरकारकडून १० हजारांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतची रक्कम गरजेनुसार थेट कारागीराच्या बँक खात्यात जमा होते. या योजनेचे उदिष्ट शहरी तसेच ग्रामीण भागातील कारागीरांची जीवनशैली वाढवणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे आहे.

नियम आणि अटी

या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही नियम आणि अटीदेखील आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचे वय २८ पेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. ही योजना न्हावी, मोची, कुंभार, विणकर, लोहार, सोनार, सुतार यांच्यासाठी आहे. दरम्यान ही योजना कोणत्याही जातीविषयक नाही. केवळ पारंपारिक व्यवसायाशी निगडित व्यक्तीशी आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला प्रमाणपत्र ग्रामपंचायत, नगरपालिकेला सादर करावे लागेल. आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खाते डिटेल्स, जाती, निवास प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

 

विभाग

पुढील बातम्या