मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM Kisan Yojana : तब्बल ४ कोटी शेतकऱ्यांना झटका! पीएम किसान योजनेचा लाभ बंद, कारण…

PM Kisan Yojana : तब्बल ४ कोटी शेतकऱ्यांना झटका! पीएम किसान योजनेचा लाभ बंद, कारण…

Nov 13, 2023, 12:14 PM IST

  • PM Kisan Yojana 15th Installment news : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १५ व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana 15th Installment news : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १५ व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

  • PM Kisan Yojana 15th Installment news : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १५ व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

PM Kisan Yojana 15th Installment news : देशभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता येत्या बुधवारी, १५ नोव्हेंबरला खात्यात जमा होणार आहे. सुमारे ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये थेट ट्रान्सफर होणार आहेत. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत नोंद असलेल्या १२ कोटींपैकी तब्बल ४ कोटी शेतकऱ्यांना नवा हप्ता मिळणार नाही. योजनेसाठी पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्याचा हा फटका आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

मोदी सरकारनं आतापर्यंत किसान सन्मान योजनेअंतर्गत १४ वेळा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. एप्रिल-जुलै २०२२-२३ मध्ये सर्वाधिक ११ कोटी २७ लाख ९० हजार २८९ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. मात्र, या योजनेतून अनेक अपात्र शेतकऱ्यांना लाभ मिळत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारनं लाभार्थ्यांची पात्रता काटेकोरपणे तपासणं सुरू केलं आहे. यातून आतापर्यंत सुमारे ४६ हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

पात्रतेचे निकष कठोरपणे तपासणं सुरू झाल्यामुळं ऑगस्ट-नोव्हेंबर २०२२-२३ मध्ये दोन कोटींपेक्षा जास्त लाभार्थी घटले व हा आकडा ८ कोटींवर आला. पीएम किसान पोर्टलवर दिलेल्या आकडेवारीनुसार, पीएम किसानचा डिसेंबर-मार्च २०२२-२३ चा हप्ता केवळ ८.८१ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला गेला. यानंतर ९.५३ कोटी शेतकऱ्यांना १४वा हप्ता किंवा एप्रिल-जुलैचा हप्ता मिळू शकला.

PPF सह विविध अल्प बचत योजनांचे नियम झाले शिथील; तुम्हाला कसा होणार फायदा?

याआधी ११ कोटींहून अधिक शेतकरी घेत होते लाभ

ई-केवायसी मागणी करण्यात आल्यानंतर आणि राज्य सरकारांद्वारे लाभार्थ्यांची गावोगाव पडताळणी केल्यानंतर पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली. यापूर्वी, एप्रिल-जुलै २०२२-२३ मध्ये ११.२७ कोटी शेतकरी कुटुंबे, २०२१-२२ डिसेंबर-मार्चमध्ये ११.१६ कोटी, ऑगस्ट-नोव्हेंबर २०२१-२२ मध्ये ११.१९ कोटी आणि एप्रिल-जुलै २०२१-२२ मध्ये ११.१९ कोटी शेतकरी कुटुंबे पीएम किसान अंतर्गत निधी योजनेचा लाभ घेतला होता.

४६ हजार कोटी वाचले!

योजना सुरू झाल्यानंतरच्या आठव्या ते ११व्या हप्त्यापर्यंत केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात अंदाजे ८९.६ हजार कोटी रुपये जमा केले होते. यात अपात्र लोकांचाही समावेश होता. पात्रता पडताळणीनंतर मागच्या तीन हफ्त्यांमध्ये सरकारनं केवळ ३५.३५ हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले. यात पुढील हप्त्याचे ८ हजार कोटी जोडल्यास ही रक्कम ४३.३५ हजार कोटी रुपये होईल. याचाच अर्थ, पीएम किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक थांबवून सरकारनं सुमारे ४६ हजार कोटी रुपयांची बचत केली आहे.

Diwali stock picks : यंदाच्या दिवाळीत ठेवा या ८ स्टॉक्सवर नजर, वर्षभरात होऊ शकता मालमाल

लाभार्थी शेतकऱ्यांची हफ्तानिहाय संख्या

१४ वा हप्ता (एप्रिल-जुलै २०२३-२४): ९५,३५,८३००

१३ वा हप्ता (डिसेंबर-मार्च २०२२-२३): ८८,१३,९८९२

१२ वा हप्ता (ऑगस्ट-नोव्हेंबर २०२२-२३): ९,००,९५,०२२

११ वा हप्ता (एप्रिल-जुलै २०२२-२३): ११,२७,९०,२८९

१०वा हप्ता (डिसें-मार्च २०२१-२२): ११,१६,२०,८५०

नववा हप्ता (ऑगस्ट-नोव्हे २०२१-२२) ११,१९,५७,२७३

आठवा हप्ता (एप्रिल-जुलै २०२१-२२): ११,१६,३४,२०२

सातवा हप्ता (डिसे-मार्च २०२०-२१): १०,२३,५६,७०४

सहावा हप्ता (ऑगस्ट-नोव्हें २०२०-२१): १०,२३,४७,९७४

पाचवा हप्ता (एप्रिल-जुलै २०२०-२१): १०,४९,३३,४९४

चौथा हप्ता (डिसेंबर- मार्च २०१९-२०): ८,९६,२७,६३१

तिसरा हप्ता (ऑगस्ट-नोव्हेंबर २०१९-२०): ८,७६,२९,६७९

दुसरा हप्ता (एप्रिल-जुलै २०१९-२०): ६,६३,५७,८५०

पहिला हप्ता (एप्रिल-जुलै २०१८-१९): ३,१६,१६,०१५

कोण आहेत अपात्र?

माजी किंवा सध्याचे मंत्री, खासदार, आमदार, महापौर, पंचायतींमध्ये घटनात्मक पदांवर असलेल्या किंवा ही पदं भूषवलेल्या व्यक्ती

सध्याचे किंवा सेवानिवृत्त केंद्र-राज्य सरकारी कर्मचारी

ज्यांचे मासिक पेन्शन रुपये १० हजार किंवा त्याहून अधिक आहे अशा सर्व निवृत्त निवृत्तीवेतनधारक

विभाग

पुढील बातम्या