मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Azad Engineerig IPO : तब्बल ८० पट सबस्क्राइब झाला आयपीओ, सचिन तेंडुलकरला २३ कोटींचा फायदा होण्याची शक्यता

Azad Engineerig IPO : तब्बल ८० पट सबस्क्राइब झाला आयपीओ, सचिन तेंडुलकरला २३ कोटींचा फायदा होण्याची शक्यता

Dec 23, 2023, 04:23 PM IST

  • Azad Engineering IPO News : आझाद इंजिनीअरिंग या कंपनीच्या आयपीओला तुफान प्रतिसाद मिळाल्यानं आता गुंतवणूकदारांचे डोळे अलॉटमेंट आणि लिस्टिंगकडं लागले आहेत. 

Sachin Tendulkar Investment

Azad Engineering IPO News : आझाद इंजिनीअरिंग या कंपनीच्या आयपीओला तुफान प्रतिसाद मिळाल्यानं आता गुंतवणूकदारांचे डोळे अलॉटमेंट आणि लिस्टिंगकडं लागले आहेत.

  • Azad Engineering IPO News : आझाद इंजिनीअरिंग या कंपनीच्या आयपीओला तुफान प्रतिसाद मिळाल्यानं आता गुंतवणूकदारांचे डोळे अलॉटमेंट आणि लिस्टिंगकडं लागले आहेत. 

Sachin Tendulkar and Azad Engineering IPO : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची गुंतवणूक असलेला आझाद इंजिनिअरिंगचा आयपीओ पुढच्या आठवड्यात शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. तब्बल ८०.६० पट सबस्क्राइब झालेल्या या आयपीओला ग्रे मार्केटमध्येही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं सर्वसामान्य गुंतवणूकदारांबरोबरच सचिन तेंडुलकर देखील मालामाल होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

आझाद इंजिनीअरिंगच्या आयपीओचा दरपट्टा ५२४ रुपये आहे. हा दरपट्टा लक्षात घेतल्यास सचिन तेंडुलकरच्या ५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं बाजार मूल्य २२.९६ कोटी रुपयांपर्यंत वाढेल, हा नफा ३६० टक्के असेल. ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओ इश्यू किमतीपेक्षा ६५ टक्के प्रीमियमवर आहे.

National Farmers Day : स्वस्त कर्जापासून सबसिडीपर्यंत… शेतकऱ्यांना फायदा देतात या ५ सरकारी योजना

आझाद इंजिनीअरिंगमध्ये सचिनचे किती शेअर्स?

सचिन तेंडुलकरनं २०२३ च्या मार्च महिन्यात या कंपनीत सुमारे ५ कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले होते. आयपीओ येण्याआधी कंपनीचा स्टॉक स्प्लिट झाला होता तसंच, कंपनीनं बोनस शेअर्सचंही वाटप केलं होतं. त्यामुळं सध्या सचिनकडं कंपनीचे ४,३८,२१० शेअर आहेत.

सिंधू, सायना आणि लक्ष्मणचीही गुंतवणूक

आझाद इंजिनीअरिंगचा आयपीओ ७४० कोटी रुपयांचा आहे. यात २४० कोटी रुपयांचा नवीन इक्विटी इश्यू आहे. तर, ५०० ​​कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेल (OFS)चा समावेश आहे. ओएफस अंतर्गत प्रवर्तक राकेश चोपदार, पिरामल स्ट्रक्चर्ड फंड आणि डीएमआय फायनान्स हे आपला हिस्सा विकत आहेत. सचिन तेंडुलकर त्याचा हिस्सेदारी विकणार नाही. पीव्ही सिंधू, सायना नेहवाल आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची देखील या कंपनीत गुंतवणूक आहे. या सर्वांनी आझाद इंजिनिअरिंगमध्ये प्रत्येकी एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Buy or Sell : पुढच्या आठवड्यात खरेदी करा 'हे' तीन शेअर; मार्केट एक्सपर्ट म्हणतात…

आयपीओला प्रतिसाद किती?

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, आझाद इंजिनियरिंगच्या आयपीओद्वारे १,०१,२२,७०५ शेअरची ऑफर देण्यात आली होती. त्यासाठी ८१,५८,६०,३८८ अर्ज आले आहेत. प्राप्त झाली. हा आयपीओ पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) विभागात १७९.६६ पट, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार विभागात ८७.५५ पट आणि किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार (RII) विभागात २३.७१ पट सबस्काइब झाला. आझाद इंजिनियरिंग लिमिटेडनं अँकर गुंतवणूकदारांकडून २२१ कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीच्या ग्राहकांमध्ये जनरल इलेक्ट्रिक, हनीवेल इंटरनॅशनल इंक., मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज, सीमेन्स एनर्जी, ईटन एरोस्पेस आणि मॅन एनर्जी सोल्युशन्स इंडिया प्रा. लि. या कंपन्यांचा समावेश आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील लेख ही केवळ कंपनीच्या कामगिरीची व आयपीओची माहिती आहे. हा कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी अधिकृत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या