मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Indian railway: पुणेकरांसाठी खुशखबर! प्रभू रामाच्या दर्शनासाठी पुणे ते अयोध्या धावणार समर स्पेशल ट्रेन्स, वाचा वेळापत्रक

Indian railway: पुणेकरांसाठी खुशखबर! प्रभू रामाच्या दर्शनासाठी पुणे ते अयोध्या धावणार समर स्पेशल ट्रेन्स, वाचा वेळापत्रक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 01, 2024 09:26 AM IST

Pune To Ayodhya Special Trains: उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती संख्या आणि मागणी बघता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे ते अयोध्या दरम्यान चार स्पेशल समर गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांच्या चार विशेष फेऱ्या होणार आहेत.

पुणेकरांसाठी खुशखबर! प्रभू रामाच्या दर्शनासाठी पुणे ते अयोध्या धावणार समर स्पेशल ट्रेन्स, वाचा वेळापत्रक
पुणेकरांसाठी खुशखबर! प्रभू रामाच्या दर्शनासाठी पुणे ते अयोध्या धावणार समर स्पेशल ट्रेन्स, वाचा वेळापत्रक

Pune To Ayodhya Special Trains: पुण्यातून उन्हाळी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी मोठी असते. या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी जात आहेत. मात्र, अयोध्या येथे जाण्यासाठी मर्यादित गाड्या असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होत होती. पुण्यातील प्रवाशांना  आयोध्येला जाता यावे यासाठी विशेष गाड्या असाव्या अशी मागणी प्रवाशांनी केली होती. या मागणीची दाखल घेत पुण्यातून अयोध्येला जाण्यासाठी ४ समर स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तीन आणि सात मे रोजी या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे रामलल्ला दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Cyber Crime : मोठ्या फ्रॉडचा धोका, गुगलने घातली 'या' ॲप्सवर बंदी! गुरुग्राम पोलिसांनी पाठवली होती नोटीस

आयोध्येत राम मंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन झाल्यानंतर देशभरातून दर्शनासाठी भाविकांची दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. विशेषत: रेल्वेने हजारो भाविक अयोध्येला दर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे ते अयोध्यादरम्यान अतिरिक्त गाड्या चालवण्यात याव्या अशी मागणी होती होती होती. ही मागणी विचारात घेऊन पुणे रेल्वे विभागाने पुणे ते अयोध्या दरम्यान, चार उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय पुणे रेल्वे विभागाने घेतला आहे. पुणे-अयोध्या (ट्रेन क्रमांक ०१४५५) उन्हाळी विशेष गाडी पुण्याहून तीन आणि सात मे या दोन दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सोडण्यात येणार आहे. ही गाडी ती तिसऱ्या दिवशी अयोध्येत सकाळी ८.५० वाजता पोहोचेल. अयोध्या-पुणे (ट्रेन क्रमांक ०१४५६) उन्हाळी विशेष गाडी ही अयोध्येहून ५ मे आणि ९ मे रोजी दुपारी ४ वाजता सुटणार आहे. ती तिसऱ्या दिवशी पुण्यात दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल.

Viral News : शंभर किलो वजनाचा पुणेकर आंब्याच्या झाडावर चढला, तिथेच बेशुद्ध पडला; पुढे काय झाले? वाचा!

या स्थानकावर असेल थांबा

पुणे विभागाने सुरू केलेही ही गाडी चिंचवड, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर आणि लखनौ या स्थानकांवर थांबणार आहे.

पुणे अजणी दरम्यान धावणार अतिरिक्त गाडी

पुणे स्थानकावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता ती कमी करण्यासाठी पुणे ते अजनीदरम्यान अतिरिक्त एकेरी उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी दोन मे रोजी पुण्याहून मध्यरात्री १२.२० वाजता सुटणार आहे. ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता अजनीला पोहोचेल. 

IPL_Entry_Point

विभाग