मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 10, 2024 07:49 PM IST

RamSetu Campaign: अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून रामसेतू मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत तरुण जलतरणपटू श्रीलंकेतील तलाईमन्नार श्रीलंका ते भारतातील धनुष्कोडी हे २१ किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार आहेत.

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या
RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून ठाण्यातील १० ते १८ वर्षे वयोगटातील तरुण जलतरणपटू ३ आणि ४ मे २०२४ रोजी ‘रामसेतू’ तलाईमन्नार (श्रीलंका) आणि धनुष्कोडी (भारत) हे २१ किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अयोध्येतील राममंदिराला मानवंदना देण्यासाठी उपक्रम

अयोध्येतील भगवान रामाला त्यांच्या कर्मस्थानी मानवंदना देण्यासाठी आणि नव्याने बांधलेल्या राममंदिराची प्रतिष्ठा वर्धिष्णू करण्यासाठी या खास मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाण्यातील पहिलीच आंतरराष्ट्रीय जलतरण मोहीम

 विशेष म्हणजे ही मोहीम ठाण्यातील पहिली आंतरराष्ट्रीय जलतरण मोहीम आहे. या मोहितेत अर्णव पाटील, अभीर साळसकर, स्वरा हंजनकर, वंशिका अय्यर, रुद्र शिराळी, शार्दुल सोनटक्के, अथर्व पवार, अपूर्व पवार, साविओला मस्कारेन्हस, स्वरा सावंत, लौकिक पेडणेकर, मीत गुप्ते असे १२ तरुण जलतरणपटू ‘पाल्क स्ट्रेट’ ओलांडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

तसेच, ही खास मोहीम यशस्वी व्हावी म्हणून संपूर्ण टिमने घंटाळी मंदिरात जाऊन घंटाळी देवी आणि प्रभू रामचंद्रांसमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले.

दिग्गजांकडून जलतरणपटूंना प्रोत्साहन

यावेळी या जलतरणपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विनय सहस्रबुद्धे, मृणाल पेंडसे, विकास घांग्रेकर, अश्विनी बापट, वरदराज बापट, अमोल फडके, क्षमा पातकर, मंगेश ओक, रामचंद्र चिवकुल याच बरोबर मुख्य प्रशिक्षक नरेंद्र पवार, प्रशिक्षक भारती सावंत तसेच प्रोजेक्ट इन्चार्ज माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आरती प्रधान व अनेक मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp channel

विभाग