मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 04, 2024 02:23 PM IST

google doodle on hamida banu : आजचे गुगल डूडल भारतातील पहिली महिला कुस्तीपटू हमीदा बानो यांना समर्पित आहे. या निमित्ताने हमिदा बानो यांच्याविषयी जाणून घ्या.

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरूष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या
Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरूष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

indias first female wrestler hamida banu : गुगलने आज (४ मे) एक खास डूडल (Google Doodle Today Hamida Banu) तयार केले आहे. कुस्तीपटू हमीदा बानो यांच्या स्मरणार्थ गुगलने हे डुडल बनवले आहे. हमीदा बानो या भारतातील पहिल्या महिला कुस्तीपटू होत्या.

ट्रेंडिंग न्यूज

विशेष म्हणजे, हमिदा बानो त्या काळात पुरूष कुस्तीपटूंना खुलेआम आव्हान देण्यासाठी ओळखल्या जायच्या. कुस्तीच्या रिंगणात त्यांच्यासमोर एकही पैलवान उभा राहू शकत नव्हता. छोटे गामा या नावाने प्रसिद्ध असलेल्या कुस्तीपटूनेही हमीदा बानोसोबत लढण्याआधी आपले नाव मागे घेतले होते.

हमिदा यांनी आजच्या दिवशी बाबा पहेलवानचा पराभव केला

आजचे गुगल डूडल भारतातील पहिली महिला कुस्तीपटू हमीदा बानो यांना समर्पित आहे. कारण आजच्या दिवशी १९५४ साली त्या कुस्ती सामन्याची बातमी प्रसिद्ध झाली होती, ज्याने हमिदा बानो यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली.

वास्तविक, हमिदा बानो यांनी प्रसिद्ध कुस्तीपटू बाबा पहेलवान यांना केवळ १ मिनिट ३४ सेकंदात पराभूत केले होते, त्या पराभवानंतर बाबा पहेलवान यांनी कुस्तीला कायमचा राम राम ठोकला. यासोबतच पंचांनी त्यावेळी जाहीर केले होते की, हमीदाला हरवून तिच्याशी लग्न करू शकेल असा कोणताही पुरुष कुस्तीपटू या देशात नाही'.

हमीदा बानो यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला

हमीदा बानो यांचा जन्म १९०० च्या दशकाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एका कुस्तीपटूंच्या कुटुंबात झाला. त्यांनी लहानपणापासूनच कुस्तीचे धडे घेतले होते. १९४० आणि १९५० च्या दशकात हमिदा यांनी कारकिर्दीत ३०० हून अधिक चॅम्पियनशिप जिंकल्या.

त्यावेळी सामाजिक समजुतींमुळे महिलांचा खेळातील सहभाग कमी होता, परंतु हमीदा यांना कुस्तीची आवड होती आणि त्या पुरुष कुस्तीपटूंशी कुस्ती खेळायच्या.

'जो कुणी कुस्तीत हरवेल त्याच्याशीच लग्न करणार'

हमिदा बानो यांनी सर्व पैलवानांना खुले आव्हान दिले होते, की जो तिला कुस्तीत हरवेल त्याच्याशीच ती लग्न करेल. हमिदा बानो यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही कुस्ती खेळली. त्यांनी रशियन महिला कुस्तीपटू वेरा चिस्टिलिनला दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात पराभूत केले होते.

यानंतर हमिदा बानो यांचे नाव वर्षानुवर्षे वर्तमानपत्रांमध्ये येत राहिले. त्यांना "अलिगढची ॲमेझॉन" म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांची माध्यमांमध्येही खूप चर्चा झाली. हमिदा बानो यांचे सामने, त्यांचा डाएट आणि ट्रेनिंग प्रोसेस या सर्वांना माध्यमांमध्ये खूप जागा मिळाली.

WhatsApp channel