मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर लागली गोळी, तरुणाचा मृत्यू

Viral News: पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर लागली गोळी, तरुणाचा मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 01, 2024 11:22 PM IST

Rajasthan Youth Dies while Making Reel: राजस्थानमध्ये पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.

राजस्थानमध्ये पिस्तुलासह रिल बनवले तरुणाच्या जीवावर बेतले आहे.
राजस्थानमध्ये पिस्तुलासह रिल बनवले तरुणाच्या जीवावर बेतले आहे.

Rajasthan Viral News: मित्रासोबत पिस्तूल घेऊन व्हिडिओ बनवत असताना पिस्तुलातील गोळी छातीवर लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही राजस्थानच्या कोटा येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत नागर असे मृत तरुणाचे नाव असून तो झालावाड जिल्ह्यातील रहिवासी आहे. नागर हा मानव्यविद्या विषयात पदवीचे शिक्षण घेत होते आणि कोटा येथे राहत होते. ही घटनेबाबत पोलिसांनी बुधवारी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Salman Khan firing Case: सलमान खान गोळीबार केल्याप्रकरणी अटक झालेल्या आरोपीची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर नगर एक्सटेंशनमधील महर्षी गौतम भवनजवळील चहाच्या टपरीवर दुपारी तीनच्या सुमारास यशवंत नागर पिस्तुलासह व्हिडिओ बनवत होता. मात्र, त्याचवेळी पिस्तुलातील सुटून यशवंत नागरच्या छातीवर लागली. या घटनेनंतर यशवंत नागरला तात्काळ न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक मनीष शर्मा पुढील तपास करीत आहेत.

Kolhapur Crime News : बायकोसोबत फोनवर बोलताना आई मध्येच बोलली, संतापलेल्या मुलाने चाकूने वार करून केली हत्या

कल्याण: रिक्षा पार्किंगवरून वाद, मारहाणीत एकाचा मृत्यू

कल्याणमध्ये रिक्षा पार्किंगवरून झालेल्या वादामुळे एकाची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीने रिक्षाचालकास रिक्षा पार्किंग करण्यास विरोध केला. त्यानंतर आरोपी रिक्षा चालकाने आपल्या साथीदारासह संबंधित व्यक्तीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या इसमाचा मृत्यू झाला. संदेश घाडसी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, नरेंद्र आडविलकर आणि विनय ताम्हणकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपींना न्यायालयात नेले असता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नवी मुंबई: धावत्या लोकलमधून तरुणाला खाली ढकलले

नवी मुंबईत धावत्या लोकलमधून एका तरुणाला ढकलून दिल्याप्रकरणी चार अज्ञात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेत संबंधित तरुणाला हात गमवावा लागला असून त्याच्या पायालाही फ्रॅक्चर झाले. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. कुमार लालजी दिवाकर (वय, ३२) असे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला चार मुले आहेत. दिवाकर हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. आठवडाभरापूर्वीच तो शहरात आला होता, अशी माहिती मिळत आहे.

IPL_Entry_Point

विभाग