मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 01, 2024 03:13 PM IST

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न
सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न

Salman Khan Firing Case: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर फायरिंग प्रकरणात (firing case) नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी माहिती दिली की, गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई पोलिसांनी सांगितले की, सलमान खान (Salman Khan) फायरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव अनुज थापन असे आहे. गोळीबार करणाऱ्यांना बंदुक पुरवण्याचा त्याच्यावर आरोप आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याला मुंबईतील जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

थापन याला मुंबई पोलिसांनी अन्य एक आरोपी सोनू सुभाष चंदर (वय ३७) सोबत २५ एप्रिल रोजी पंजाबमधून अटक करण्यात आली होती.

सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या गॅलेक्स अपार्टमेंटमधील निवासस्थानाबाहेर १४ एप्रिलच्या पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. हल्लेखोर मोटरसायकलवरुन आले होते व त्यांनी सलमानच्या घराच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या. यापैकी २ गोळ्या सलमान खानच्या लिव्हिंग रुमच्या भिंतीला लागल्या होत्या. या घटनेनंतर सलमान व त्याच्या कुटूंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत १६  एप्रिल रोजी गुजरातमधील भूज जिल्ह्यातून गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीनंतर त्यांना शस्त्रं पुरवाणाऱ्या २ आरोपींना पंजाबमधून अटक करण्यात आली. याच दोन आरोपींपैकी एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला.

२ पिस्तुल व १७ काडतुसे तापी नदीतून बाहेर काढली - 

सलमानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींकडे दोन पिस्तूल तसेच ३८ जिवंत काडतुसे सापडली होती. त्यांना शस्त्रे पुरविणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना २५ एप्रिल रोजी पंजाबमधील वेगवेगळ्या भागातून अटक केली होती. सोनू सुभाष चंदर (वय ३७) आणि अनुज थापन (वय ३२) अशी या दोघांची नावे आहेत. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अन्य ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली. 

गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून गुजरातमधून मुख्य आरोपीला अटक केली. गोळीबार करण्यासाठी वापरलेली २ पिस्तूल आणि सुमारे १७ काडतुसे पोलिसांनी पाणबुड्यांच्या साह्याने सुरतजवळ तापी नदीच्या पाण्यातून बाहेर काढली आहेत.

IPL_Entry_Point